आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणीचा अपकमिंग प्रोजेक्ट:आगामी 'मिसेज चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटाच्या शूटिंगसाठी राणी मुखर्जीला नॉर्वेला रवाना, एक महिना राहणार देशाबाहेर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच सुरू होणार पहिला भाग

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या आगामी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नॉर्वेला रवाना झाली आहे. या चित्रपटाची कथा एका आईवर आधारित आहे. ती संपूर्ण देशाविरुद्ध लढा देतेे. याचे दिग्दर्शन ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी दिग्दर्शिका आशिमा छिब्बर करणार आहेत.

राणी लवकरच नॉर्वेमध्ये याचे शूटिंग सुरू करणार आहे. ते शूटिंग तेथे एक महिना चालणार आहे. निर्माते निखिल अडवाणी आणि झी स्टुडिओ संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी बरीच तयारी केली आहे. चित्रपटाची कहाणी नॉर्वेमधील 2011 मध्ये घडलेल्या भारतीय वंशाच्या दाम्पत्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. यात नॉर्वेचे अधिकारी दाम्पत्याला त्यांच्या मुलांपासून दूर करतात.

2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्दानी 2’ नंतर राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली 2’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. तिचा हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून महामारीमुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. 2005 च्या सुपरहिट 'बंटी और बबली' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

बातम्या आणखी आहेत...