आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य आणि बॉलिवूडच्या हिट चित्रपटांचा रिमेक करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अलीकडच्या काळात भूमी पेडणेकरच्या 'दुर्गामती'पासून 'लक्ष्मी'पर्यंत अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत, त्यातील काही रिमेकला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले, तर काही चित्रपटांवर मात्र फ्लॉपचा ठपका बसला. पाहूया कोणते रिमेक चित्रपट हिट ठरले आणि कोणते फ्लॉप....
लक्ष्मी - अक्षय कुमार आणि किआरा आडवाणी स्टारर 'लक्ष्मी' हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झालेल्या कांचना या दक्षिणेतील हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाची बरीचशी दृश्ये पूर्वीच्या चित्रपटाशी अगदी मिळती-जुळती आहेत. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने ओटीटीवरील सर्वाधिक व्युअरशिपचा रेकॉर्ड तोडला आहे.
कबीर सिंग- 2019 मधील हा चित्रपट अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते. तर कबीर सिंगमध्ये शाहिद कपूर आणि किआरा आडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 379 कोटींचा व्यवसाय केला होता.
दिल बेचारा- 24 जुलै रोजी रिलीज झालेला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी स्टारर हा चित्रपट हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'फॉल्ट इन अवर' स्टार्सचा हिंदी रिमेक आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरल्याने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिलीज होताच 9.7 रेटिंग मिळवणारा हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला होता. मात्र नंतर त्याचे एकूण रेटिंग 7.9 राहिले.
ड्राइव्ह- सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'ड्राइव्ह' हा चित्रपट 2019 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2011 च्या ड्राईव्ह या हॉलिवूड चित्रपटाचा हिंद रिमेक आहे.
बागी 3 - टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख स्टारर अॅक्शन फिल्म बागी 3 हा 2016 च्या बागी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाची कहाणी 2012 मध्ये रिलीज झालेल्या वेत्ताई या तामिळ चित्रपटावर आधारित आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 137 कोटींचे कलेक्शन केले होते.
चश्मे बद्दूर - 2011 मध्ये चश्मे बद्दूर या चित्रपटात तापसी पन्नू, अली जाफर, दिव्येंदु शर्मा आणि सिद्धार्थ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 1981 च्या गाजलेल्या चश्मे बद्दूर या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान आणि युएईमध्येही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.
दुर्गामती- भूमी पेडणेकर स्टारर दुर्गामती हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली आहे. तेलगू-तामिळ द्विभाषिक चित्रपट भागमतीचा हा हिंदी रिमेकमध्ये आहे.मुळ चित्रपटात अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. अनुष्काचा चित्रपट हिट ठरला होता. मात्र दुर्गामतीला अतिशय वाईट रेटिंग्स मिळत आहे.
लव आज काल - सारा अली खान, वरुण धवन, आरुषी शर्मा आणि रणदीप हूड्डा स्टारर लव आज कल हा चित्रपट इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव आज कल’ या चित्रपटाचा रिमेक आहे जो चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना इम्प्रेस करु शकला नाही. या चित्रपटाने केवळ 52.63 कोटींची कमाई केली.
पती पत्नी और वो - 2019 मध्ये प्रदर्शित झालेला पती पती और वो हा चित्रपट बीआर चोप्रांच्या 1979 मध्ये आलेल्या पती पत्नी और वोचा रिमेक आहे. यात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना प्रभावित करण्यात चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.
हे आयकॉनिक चित्रपट आहेत हिट हिट चित्रपटांचे रिमेक
शुभ मंगल सावधान | कल्याणम सम्याल साधम (मल्याळम) |
जुडवा | हॅलो ब्रदर (तामिळ) |
अनजाना अनजानी | थिलू श्रावणी सुब्रह्मण्यम (तेलुगू) |
सिंघम | सिंघम (तामिळ) |
बॉडीगार्ड | बॉडीगार्ड (मल्याळम) |
तेरे नाम | सेथू (तामिळ) |
वाँटेड | पोकीरू (तेलुगू) |
बीवी नंबर 1 | साथी लीलावती (तामिळ) |
गजनी | गजनी (तामिळ) |
दृश्यम | दृश्यम (मल्याळम) |
भूल भुलैया | मणिचित्राथादू (मल्याळम) |
हेरी फेरी | रामजी राव स्पीकिंग (मल्याळम) |
नायक | मुधालवम (तामिळ) |
बिल्लू | काथापरायुमबोल (मल्याळम) |
जुदाई | शुभ लग्नम (तेलुगु) |
गरम मसाला | बोईंग - बोईंग (मल्याळम) |
फोर्स | काखा काखा (तामिळ) |
हाऊसफुल 2 | मत्तूपेटू मचन (मल्याळम) |
साथिया | अलाइपयूथे (तामिळ) |
गॉड तुस्सी ग्रेट हो | ब्रुस ऑलमाइटी (हॉलिवूड) |
प्लेअर | द इटालियन जॉब (हॉलिवूड) |
अॅक्शन रीप्ले | बॅक टू फ्यूचर (हॉलिवूड) |
चॉकलेट | द युजुअल सस्पेक्ट (हॉलिवूड) |
प्रिन्स | द बोर्न आइडेंटिटी (हॉलिवूड) |
राम गोपाल वर्मा की आग | शोले (बॉलिवूड) |
कर्ज (2000) | कर्ज (1980) |
उमराव जान (2006) | उमराव जान (1981) |
हिम्मतवाला (2013) | हिम्मतवाला (1980) |
- | - |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.