आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा बॉलिवूडला जोरदार फटका बसला. मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली होती. चित्रपटांचे शूटिंग पूर्णपणे थांबवावे लागले. स्टार्स आपापल्या घरात कैद झाले आणि कामावर परतण्यासाठी ही महामारी संपण्याची प्रतीक्षा करु लागले. पण आता अनेक स्टार्स सेटवर परतू लागले आहेत. ब-याच मोठ्या स्टार्सनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या सा-यांनी सर्व खबरदारी घेऊन चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.
लॉकडाउनमध्ये शूट करणारा अक्षय पहिला स्टार
या यादीतील पहिले नाव अक्षय कुमारचे आहे, ज्याने कोरोनाच्या काळात स्कॉटलंडमध्ये आपल्या 'बेलबॉटम' चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. जगातील हा एकमेव असा चित्रपट आहे ज्याचे शूटिंग लॉकडाउनमध्ये सुरू झाले व लॉकडाउन संपले. चित्रपटातील कलाकार आणि क्रू यूकेला गेले. येथे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले.
दीपिका आणि शाहरुखही कामावर परतले
कोरोना टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेत दीपिका काही दिवसांपूर्वीच शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यात दाखल झाली होती. तेथे सुमारे 60 दिवसांचे वेळापत्रक तिने पूर्ण केले.
चित्रपटाचे पुढील शेड्युल आता डिसेंबरमध्ये मुंबईत आहे. या चित्रपटात दीपिकासह सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
जवळपास अडीच वर्षांनंतर शाहरुख खान देखील मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सेटवर परतला. अलीकडेच त्याने त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
सलमान राधेसाठी शूट करत आहे
अनलॉक 5 ची घोषणा झाल्यानंतर सलमानने ऑक्टोबरमध्ये आपल्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाचे शूटिंग सुरु केले.
त्याने सेटवरचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत मुंबईत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती. सोबत त्याने लिहिले होते - साडे सहा महिन्यांनंतर शूटिंगवर परतल्याने चांगले वाटत आहे.
जॉन लखनऊमध्ये शूटिंग करत आहे
कोरोनानंतर जॉन अब्राहमही सेटवर परतला आहे. त्याने लखनौमध्ये सत्यमेव जयते चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जॉन आणि दिव्या कुमार खोसला गेल्या एक महिन्यापासून लखनौमध्ये आहेत.
आयुष्मान खुराना चंदीगडमध्ये शूटिंग करत आहे
अनलॉकनंतर आयुष्मानही शूटवर परत आला आहे. तो गेल्या एक महिन्यापासून चंदीगडमध्ये 'चंदीगड करे आशिकी' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
चंडीगड हे आयुष्मानचे मूळ गाव आहे पण तरीही अभिनेता कुटुंबापासून दूर राहतोय. कुटुंबाला आपल्याकडून कोरोनाचा धोका उद्भवू नये म्हणून आयुष्मान शूटिंगनंतर घरी न जाता हॉटेलमध्ये राहतो.
गरोदरपणातही अभिनेत्री घेत आहेत रिस्क
कोरोना अनलॉकनंतरही गर्भवती असलेल्या अभिनेत्रीदेखील कामावर परतल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये करीनाने लालसिंग चड्ढाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला आणि तिने तिचे शूट पूर्ण केले. यावेळी सेटवर कलाकरांच्या नियमित कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या.
त्याचवेळी 7 महिन्यांची गर्भवती अनुष्का शर्मा ब्रँड एंन्डॉर्समेंटच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती. अनुष्काच्या सुरक्षिततेची काळजी घेत निर्मात्यांनी क्रू मेंबर्सना कोणाशीही संवाद साधण्याची मुभा दिली नव्हती. संपूर्ण टीम हॉटेलमध्ये थांबली होती आणि बरेच दिवस कुणीही घरी गेले नव्हते.
जानेवारीपासून मध्य प्रदेशात 22 चित्रपटांचे चित्रीकरण होणार आहे
मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, जानेवारीपासून सुमारे 22 प्रोजेक्ट्सचे शुटिंग सुरू होणार आहे. याची पुष्टी पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सोनिया मीना यांनी केली. त्या म्हणाल्या की, यात काहीही आश्चर्यकारक नाही.
गृह मंत्रालयाने अनलॉकची घोषणा केल्यापासून शूटिंगने वेग पक़ला आहे. 'एक दूजे के वास्ते' पासून ते अनुपम खेर यांच्या 'द लास्ट शो' आणि विद्या बालनच्या 'शेरनी' या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले. अद्याप सतत शूटिंगचे अर्ज येत आहेत.
मंडळाच्या आणखी एका अधिका-याने सांगितले की, "जानेवारीपासून राज्यातील विविध भागांमध्ये "धाकड', "व्हिसल ब्लोअर", "गुल्लक 2", "पंचायत 2", "कोटा फॅक्टरी", "छोरी" आणि यांचे चित्रीकरण होणार आहे. वेब सीरीजसह आणखी बरेच प्रोजेक्ट्स साइन होत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.