आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट:एक्स वाइफच्या पॉर्न DVD बनवल्या, पैशांसाठी भारतात आला; छोट्या भावाचे अदनान सामीवर आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी सध्या वादात सापडला आहे. त्याचा धाकटा भाऊ जुनैदने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जुनैदने अदनानचे शिक्षण आणि जन्मस्थळाविषयी माहिती उघड केली आहे. तसेच अदनानच्या भारतातील नागरिकत्वाबद्दल तसेच त्याच्या एक्स वाइफबद्दल देखील जुनैदने पोस्टमध्ये लिहिले आहे.

पोस्ट डिलीट केली
जुनैद सामीने सोशल मीडियावर अदनान सामीबाबत एक पोस्ट शेअर केली होती, नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. पण या पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. जुनैद सामीने या पोस्टमध्ये लिहिले, 'आता इमरान खान होण्याची वेळ आली आहे. मी माझा मोठा भाऊ अदनान सामीबद्दल अनेक सत्ये उघड करणार आहे. मी आता कोणालाही घाबरत नाही. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण मला हे करावे लागत आहे. कारण आता सत्य लोकांसमोर येणे खूप गरजेचे आहे.'

अदनानसोबत दिसणारी व्यक्ती म्हणजे त्याचा भाऊ जुनैद सामी खान. त्याने अदनानवर गंभीर आरोप केले आहेत.
अदनानसोबत दिसणारी व्यक्ती म्हणजे त्याचा भाऊ जुनैद सामी खान. त्याने अदनानवर गंभीर आरोप केले आहेत.

'लंडनमध्ये नव्हे पाकिस्तानात झाला अदनानचा जन्म'
अदनानने सांगितल्यानुसार, त्याचा जन्म पाकिस्तानात नव्हे तर लंडनमध्ये झाला. तो अनेकदा पाकिस्तानला ट्रोल करत असतो. आता जुनैदने अदनानवर गंभीर आरोप करत म्हटले की, 'अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला. माझाही जन्म 1973 मध्ये याच हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा खोटा आहे. इंग्लंडमध्ये ओ लेव्हलमध्ये नापास झाल्यानंतर त्याने लाहोरमधून पदवी मिळवली.' असे जुनैदने पोस्टमध्ये लिहिले आहे.

भारतात चांगले पैसे मिळतात
पुढे जुनैदने पोस्टमध्ये लिहिले, 'अदनान सामीने भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला तेथे चांगले पैसे दिले जात होते. जे पाकिस्तान देऊ शकले नाही. त्याच्या आईचा जन्म भारतात झाल्याचा दावा अदनानने केला होता. हा दावाही खोटा आहे'

दुसरी पत्नी सबा गलादरीसोबत अदनान. अदनानने एकूण तीन विवाह केले आहेत.
दुसरी पत्नी सबा गलादरीसोबत अदनान. अदनानने एकूण तीन विवाह केले आहेत.

एक्स वाइफचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले
जुनैदने अदनानच्या एक्स वाइफबद्दल पोस्टमध्ये लिहिले, 'अदनानने 2007-8 च्या सुमारास एक्स वाइफ सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. या गोष्टी सबा आणि अदनान हे दोघे कोणालाही सांगत नव्हते. अदनानने या डीव्हीडी कोर्टामध्ये दाखवल्या होत्या. तेव्हा अदनान म्हणाला की, हा व्हिडिओ त्याने बनवला नसून सबाच्या प्रियकराने बनवला आहे. त्याचे हे बोलणे खोटे आहे. मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत देखील असे कधीच वागणार नाही.'

2016 मध्ये अदनानला मिळाले भारतीय नागरिकत्व
लंडनमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अदनान सामीचे वडील अर्शद सामी खान पाकिस्तानी हवाई दलात पायलट होते. अदनान एक गायक तसेच संगीतकार, आणि पियानोवादक आहे. हिंदी आणि दक्षिणेतील चित्रपटांसाठी तो भारतीय आणि पाश्चात्य संगीत तयार करतो. अदनानला भारत सरकारकडून पद्मश्रीही मिळाला आहे. 1986 मध्ये त्याने आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. अदनान सामीचे लाइव्ह इन कराची, तेरी कसम, किसी दिन, प्रेस प्ले यांसारखे अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस आले. तेरा चेहरा, कभी तो नजर मिलाओ, भर दो झोली मेरी या अदनानच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

अदनान सामी 2001 पासून भारतात वास्तव्याला आहे. त्यानंतर सामीने भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. गेली 15 वर्षे तो व्हिसा घेऊन भारतात राहात होता. 1 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने अदनान सामीला भारताचे नागरिकत्व बहाल केले. भारतीय कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता आदी क्षेत्रांत विशेष योगदान देणा-या कोणत्याही व्यक्तींना मानवतावादी भूमिकेतून भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. सामीचे गायन आणि संगीत क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्याला भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.