आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलक मुच्छालच्या लग्नविधींना सुरुवात:बघा हळद आणि मेंदी सेरेमनीचे PHOTOS, उद्या संगीतकार मिथुनसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'चाहू मैं या ना' आणि 'मेरी आशिकी...' यांसारखे हिट गाणे आणि आपल्या आवाजाने सर्वांना मत्रंमुग्ध करणारी बॉलिवूड गायिका पलक मुच्छाल 6 नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार मिथुनसोबत ती बोहल्यावर चढणार आहे. यादोघांच्या लग्नाचे विधी 4 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. पलकला हळद लागली असून तिच्या हातावर मिथुनच्या नावाची मेंदी लावण्यात आली आहे. या सेरेमनीचे खास फोटो समोर आले आहेत.

हळद सेरेमनीत पलकने पिवळ्या रंगाचा लहेंगा परिधान केलेला दिसतोय.

पलक आणि मिथुन यांच्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांव्यतिरिक्त बी-टाऊनचे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.

मेंदी सेरेमनीत पलकने मोरपंखी कलरच्या लहेंग्याला पसंती दिली होती.

पलक आणि मिथुनचे लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे. यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल 5, 6 आणि 7 तारखेसाठी बुक करण्यात आले आहे.

पलक आणि मिथुन यांनी लग्नानंतर बॉलीवूड रिसेप्शन पार्टी देखील आयोजित करणार आहेत. ही पार्टी मुंबईत होणार असून, त्यात नामवंत सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन आणि पलकने याआधी एकत्र काम केले असले तरी ते कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. हे जोडपे अरेंज्ड मॅरेज करणार आहेत. त्यांच्या दोघांच्या फॅमिली फ्रेंड्सनी हे स्थळ सुचवले आहे.

खरंतर पलकच्या आई-वडिलांची तिने अरेंज मॅरेज करावे, अशी इच्छा होती. जेव्हा ते मिथुन आणि त्याच्या कुटुंबाला भेटले तेव्हा त्यांनी हे स्थळ आवडले. अशा प्रकारे दोघांचे लग्न निश्चित झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षाच्या शेवटी हे जोडपे हनीमूनसाठी कामातून ब्रेक घेणार आहेत.

दोघांनी पहिल्यांदा 'आशिकी 2' मध्ये एकत्र काम केले होते. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. म्हणजेच दोघेही जवळपास 9 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

पलकने चॅरिटीसाठी गाण्यांनी सुरुवात केली आणि स्वतःचे खासगी अल्बम रिलीज केले. त्याच बरोबर तिने आशिकी 2, आर... राजकुमार, जय हो, किक, गब्बर इज बॅक, बाहुबली: द बिगिनिंग, प्रेम रतन धन पायो, एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरीसाठी हिट गाणी गायली आहेत.

बातम्या आणखी आहेत...