आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांबावर आदळल्यावर राकेश 17 दिवस कोमात होते:सलमानच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, सुनील शेट्टीने 1200 रुपयांसाठी थोबाडीत मारली

उमेशकुमार उपाध्यायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या स्ट्रगल स्टोरीजमध्ये बोलुयात स्पॉटबॉय राकेश दुबेबद्दल. ज्याने 30 वर्षांपूर्वी फिल्मी दुनियेत आपला संघर्ष सुरू केला, जो आजतागायत सुरू आहे. 30 रुपये पगारावर कामाला सुरुवात करणारे राकेश आजही जास्तीत जास्त 2000 रुपये कमावू शकतात. आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक तरुणांना हिरो आणि सुपरस्टार होताना पाहिले आहे. लहानपणी कौटुंबिक कलहांनी त्रस्त होऊन दोन दिवस उपाशी राहून कामाच्या शोधात ते मुंबईत आले. 30 रु. रोज आणि एक वेळचे जेवण मिळाल्याने कामाला सुरुवात केली आणि आजही हा संघर्ष सुरूच आहे.

1989 मध्ये 'मैंने प्यार किया' या चित्रपटात पहिल्यांदा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले, परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की, अभिनय आपला प्रांत नाही. म्हणून चित्रपटांमध्ये स्पॉटबॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 33 वर्षांनंतरही राकेश यांना चित्रपटांच्या सेटवर स्पॉट दादा म्हणून ओळखले जाते. अनेक कलाकारांना आपल्यासमोर स्टार बनताना बघणारे राकेश आज त्यांचीच कहाणी सांगत आहेत. 1200 रुपये परत न करता आल्याने सुनील शेट्टी यांनी त्यांना थोबाडीत देखील मारली आहे. बॉलिवूडच्या 15000 स्पॉटबॉयपैकी एक असलेल्या राकेश यांची कहाणी वाचा त्यांच्याच शब्दांत…

वडिलांनी उपचारासाठी पैसे न दिल्याने आईने घर सोडले
मी दोन वर्षांचा असताना खूप आजारी पडलो. आईने वडिलांकडे उपचारासाठी पैसे मागितले, मात्र पैसे मिळाले नाहीत. याचा राग मनात घेऊन आई मला घेऊन तिच्या माहेरी निघून आली. आईच्या माहेरच्या घरीच माझ्यावर उपचार झाले. वडील पैशांसाठी गावावरून मुंबईला गेले आणि अनेक वर्षांनी परतले. वडील आल्यावर माझ्यासोबत आईही त्यांच्याकडे परत आली, पण घरात आईचा आदर होत नसल्यामुळे भांडण, विसंवादाचे वातावरण होते. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटायचे. म्हणून मी घर सोडून कुठेतरी पळून जावं असा विचार केला.

केस कापण्याचे पैसे घेऊन राकेश दुबे मुंबईला पळून आले

एके दिवशी माझे चुलत भावाशी भांडण झाले, तेव्हा माझ्या वडिलांनी मला खूप मारले. मला फक्त मारहाणच केली नाही तर माझे हात पाय बांधून मला विहिरीत लटकवण्यात आले. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या लहान भावाला केस कापण्यासाठी पैसे दिले. मी माझ्या धाकट्या भावाला त्याचे केस कापायला लावले आणि मी तेथून मुंबईला पळून गेलो.

मुंबईत पत्ता माहित नसताना आजोबांकडे आलो
मुंबईतील दहिसर येथील भातलादेवी मंदिराजवळ माझ्या आजोबांचा गोठा आहे, मी एवढंच ऐकले होते. त्यामुळे गावातून पळून कसा तरी मी मुंबईत आलो. दुसरीकडे, माझी आई खूप रडत होती. काकांनी मी बेपत्ता झाल्याची बातमी रेडिओवर जाहीर केली होती. मी घरच्यांना न सांगता आल्याने घरी सगळे एवढे काळजीत पडतील याची मला कल्पना नव्हती.

मुंबईला पोहोचल्यावर घरच्यांना पत्र लिहून मी आजोबांकडे आलोय, ही बातमी कळवली. माझ्या शोधात माझे वडील त्यांच्या पुतण्यासोबत मुंबईला आले. हे दोघे मुंबईत आल्याची बातमी मला मिळाली, तेव्हा मी खूप घाबरलो. मला वाटले की मी त्यांना भेटलो तर मला खूप मारले जाईल. एके दिवशी दोघांना येताना पाहिले, आणि मी तेथूनही पळून गेलो.

राकेश दुबे खांबाला आदळल्याने कोमात गेले होते

मुंबईत राहून जे काही छोटे मोठे काम मिळेल ते मी करत राहिलो. 1983 मध्ये नातेवाईकांनी मला गॅरेजमध्ये ठेवले. एके दिवशी जोगेश्वरीहून दहिसरला येत असताना माझा अपघात झाला. प्रवासादरम्यान कांदिवली ते बोरिवली दरम्यान एका खांबाला धडकल्याने मी खाली पडलो. माझ्या डोक्याला इतकी गंभीर दुखापत झाली की, मी कोमात गेलो.

मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16-17 दिवस कोमात राहिलो. त्यानंतर मला थोडी शुद्ध आली. डॉक्टर मला पत्ता विचारायचे, पण भीतीमुळे मी त्यांना पत्ता सांगत नव्हतो. पण नंतर आजोबांच्या घरचा दहिसरचा पत्ता दिला. मग आजोबा, वडील, सगळे भेटायला आले. हळुहळु बरा झालो, आणि पुन्हा जोगेश्वरीला आलो. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या एका नातेवाईकाची मुले माझ्या वडिलांबद्दल अपशब्द बोलले, त्यामुळे मी चिडून तेथून निघून गेलो.

फिल्म स्टुडिओत जाण्यासाठी नोकरी सोडली

मला थोडे बरे वाटल्यानंतर मी नोकरी करण्याचा विचार केला. दहिसरमध्ये काम शोधत असताना मला घड्याळाचा पट्टा बनवणारी कंपनी सापडली, ज्यामध्ये मला दिवसाचे 8 तास काम करण्यासाठी 7 रुपये मिळायचे. मी म्हणालो की सेठ 7 रुपये खूप कमी आहेत, तर उत्तर मिळाले, मग कुठेतरी काम शोध, पण मला वाटले की मला जे काम मिळत आहे तेच करावे.

यादरम्यान मला कळले की, मुंबईतील नटराज स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू आहे, पण त्यांनी मला आत येऊ दिले नाही. तिथे मेंबरशिप कार्ड बनवण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी किमान 60 ते 70 रुपये लागतात. घड्याळाचा पट्टा बनवणाऱ्या कंपनीत 15 दिवस काम केले आणि तेथून पैसे घेऊन अंधेरीला आलो.

2 दिवस स्टुडिओबाहेर न जेवता पडून होतो
नटराज स्टुडिओत आल्यावर एक-दोन दिवस जेवणही केले नव्हते. कारण त्या पैशातून कार्ड बनवायचे होते. मी दोन दिवस नटराज स्टुडिओच्या गेटवर पडून होतो. तेथे काही सुरक्षा रक्षकांनी तू असे उपाशीतापाशी इथे का पडून आहेस? असे विचारले. मी कामाच्या शोधात असल्याचे त्यांना सांगितले. तो म्हणाला, की तूला कार्डशिवाय स्टुडिओमध्ये प्रवेश दिला जाऊ शकत नाही. त्याने त्याचे कार्ड रणजीत स्टुडिओमध्ये बनवले असल्याचे मला सांगितले. कार्डशिवाय कोणीही कामावर घेणार नाही. मी म्हणालो तू मला थोडी मदत करतोस का? त्याने विचारले- तुला स्वयंपाक करता येतो का? मी म्हणालो हो, मी स्वयंपाक करेन. पण त्यावेळी मला पोळी कशी बनवायची हे देखील माहित नव्हते. त्याने मला वरण भात करायला सांगितला आणि पोळ्या मी आल्यावर करेन असे सांगितले. मी खूश झालो कारण मला स्टुडिओच्या आत राहायला मिळणार होते. अशा प्रकारे स्टुडिओमध्ये राहण्याची मला संधी मिळाली.

'मैंने प्यार किया' या चित्रपटातून झाली इंडस्ट्रीत एन्ट्री

एकदा मी एका माणसाला भेटलो आणि त्याला सांगितले की मला कामाची गरज आहे. त्याने मला चित्रपटात लहान मुलाची भूमिका दिली. मैंने प्यार किया टायटल साँगचे शूटिंग चालू होते. आम्हाला झोपडीत बसायला सांगितले. या शूटसाठी मला 30 रुपये आणि एका दिवसाचे जेवण मिळाले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. अशा प्रकारे मी सुमारे 300-400 रुपये कमावले.

अभिनय माहीत नव्हता म्हणून स्पॉटबॉय झालो

मला अभिनय येत नव्हता, त्यामुळे मला स्पॉटबॉयचे काम यापेक्षा सोपे वाटले. असोसिएशनचे स्पॉटबॉयचे कार्ड घेण्यासाठी मी रणजीत स्टुडिओत गेलो. त्यावेळी मला ना मिशा होती ना दाढी. त्यांनी मला सांगितले की तू अजून लहान आहेस. काही वर्षे थांब आणि पुन्हा परत ये. मी घाबरलो.

मी स्टुडिओत गेलो, मी स्टुडिओच्या माणसाला सांगितले की मला मिशी हवी आहे, म्हणून त्याने पेन्सिलने मिशी बनवली आणि माझा फोटो क्लिक केला. मी पुन्हा रणजीत स्टुडिओत गेलो तेव्हा तो म्हणाला, तू मोठा अभिनेता झालास, तुला एवढे कसे सुचले. शेवटी मला माझे कार्ड 60 रुपयांना मिळाले. आता त्याच कार्डची किंमत 60 हजार रुपये आहे.

'युगंधर' या चित्रपटात पहिल्यांदा स्पॉटबॉय बनलो
मिथुन चक्रवर्ती आणि संगीता बिजलानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या युगंधर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मड आयलंडच्या किल्ल्यात शूटिंग चालू होते. त्यात मला स्पॉटबॉयची नोकरी मिळाली. मोठ्या लोकांची काळजी घेणे, खाण्यापिण्याची, चहा-पाण्याची व्यवस्था करणे ही कामे करावी लागली. तिथून बाहेर पडल्यानंतर मला इतर चित्रपटात काम मिळू लागले.

'दुल्हे राजा'मध्ये गोविंदासोबत अभिनय केला

मला गोविंदाच्या दुल्हे राजा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एका दृश्यात मी गोविंदाची मालिश केली आहे. दृश्य असे होते की जेव्हा गोविंदा त्याच्या गार्डसोबत चहाच्या दुकानात थांबतो तेव्हा मी त्याचे पाय दाबतो. या चित्रपटानंतर मी पुन्हा स्पॉटबॉय म्हणून काम करायला सुरुवात केली.

1200 रुपयांसाठी सुनील शेट्टींनी मारल्या दोन थापडा
एकदा मी सुनील शेट्टीसोबत काम करत होतो. त्यावेळी फारसे पैसे मिळत नव्हते. मी जाऊन सुनील शेट्टीच्या शेजारी उभा राहिलो. तुम्ही इथे का उभे आहात असे विचारले. मी संकोचलो आणि म्हणालो की सर मला 1200 रुपये हवे आहेत. नंतर देईन असे तोंडातून बाहेर पडले. फिल्मसिटीमध्ये शूटिंग सुरू असताना त्यांनी मला पैसे दिले. त्यानंतर जेव्हा-जेव्हा सुनील शेट्टी साहेब मला काम करताना पाहायचे तेव्हा ते येऊन विचारायचे की माझे पैसे कुठे आहेत. मी म्हणायचो, साहेब, आता नाहीत, मी कमावून देईन.

20-25 दिवसांनी त्यांनी पुन्हा बोलावून पैसे कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना खूप राग आला होता. त्यांनी मला फिल्मिस्तानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावले आणि मग विचारलं. मी म्हणालो आता माझे काम बंद आहे, पण मी पैसे नक्की परत देईन. ते म्हणाले, परत करायचे नव्हते तर पैसे का घेतले आणि त्यांनी माझ्या दोन कानशिलात लगावल्या. मला वाटले ते मोठे व्यक्ती आहेत, मी त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत. त्याचवेळी मी कोणाकडूनही पैसे घेणार नाही, असा निश्चय केला.

त्यांच्या पर्सनल बॉयने मला सांगितले की, आता साहेबांसमोर येऊ नकोस नाहीतर तुला पुन्हा मारतील. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटलो नाही. एके दिवशी सुनील शेट्टी शूटिंगसाठी पवईत आले होते, पण त्यांचा ड्रायव्हर म्हणाला की, त्यांच्यासमोर जाऊ नकोस नाहीतर ते पुन्हा मारतील, म्हणून मी त्यांच्यासमोर गेलो नाही.

1700 मागितल्यावर जॅकी श्रॉफ 70 हजार देण्यास तयार झाले होते
जॅकी दादा प्रत्येकाला भरपूर पैसे देतात असे मी ऐकले होते. ते दिलदार व्यक्ती आहेत. कोण लहान आहे की मोठा कोण हे ते कधीच पाहत नाहीत. एके दिवशी मला पैशांची गरज होती.

कोणताही मार्ग उरला नव्हता. मला वाटले की ते रागावतील. पण हिंमत एकवटून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मी त्यांना सांगितले की दादा, माझे घर तुटले आहे, मुले येत नाहीयेत. जॅकी दादा गंमतीने म्हणाले, मी तुला लग्न करुन मुलांना जन्म देण्यास सांगितला होता का? मग त्यांनी किती पैसे हवेत, असे विचारले. मी म्हणालो जास्त नाही, फक्त 1700 रु. त्यांनी एका मुलाला 70 हजार रुपये घरी पोहोचवण्यास सांगितले.

त्यांनी पत्ता विचारला. मी म्हणालो की मला 70 हजार नाही तर 1700 रुपये हवे आहेत. ते ठिक आहे म्हणाले. मला वाटले की ते बिझी असतात. शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या कुठे लक्षात राहणार. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा माणूस घरी पोहोचला. त्याने मला 1900 रुपये दिले, तसेच माझे जॅकी दादांशी बोलणे करुन दिले.

टीव्ही मालिकेतही हात आजमावला
2010 मध्ये मी सुख शरणला भेटलो. त्यावेळी तो इम्तिहान ही मालिका करत होता. आम्हाला तुला एक भूमिका द्यायची आहे, असे त्याने मला सांगितले. तसेच तुला ऑफिसमध्येही काम करावे लागेल. मी मान्य केले. त्याचे पूर्ण 105 एपिसोड आले. त्यात मला नोकराची भूमिका मिळाली. मला दिवसाला 200-250 रुपये मिळायचे.

अभिनेता झाल्यानंतर पुन्हा स्पॉटबॉय बनण्याच्या संकोचात 2 वर्षे काम केले नाही
त्यावेळी माझी साडे साती सुरू झाली आणि काम थांबले. 2 वर्षांनी शो बंद झाल्यावर मी घरी बसलो. मला असे वाटायचे की लोक म्हणतील की, तो अभिनेता होता आणि आता पुन्हा स्पॉटबॉय म्हणून काम करू लागला. कुठेतरी 5 ​​दिवस, 10 दिवस काम मिळायचे. माझ्याशी कोणी वाईट वागले तर मी एकतर मारायचो किंवा माझे काम सोडून द्यायचो. काही अभिनेत्यांशी वाद झाले तर मलाच त्यांची समजूत घालावी लागायची.

अनेक वर्षांनंतर भेटल्यानंतरही सलमान खानने ओळखले
त्यावेळी अभिनेत्री श्रीपदासमोर माझे भांडण झाले होते. तिथे जेवायला उशीर झाल्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर मी तो चित्रपट सोडला आणि 2008 मध्ये सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये काम केले. मी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये फार काळ काम केले नाही. त्यानंतर 2015-16 मध्ये मी पुन्हा त्याच्या निर्मिती संस्थेत आलो. मी पुन्हा आलो तेव्हा सलमान सरांनी मला ओळखले कारण आम्ही मैने प्यार कियामध्ये एकत्र काम केले होते. आम्ही एकत्र काम केल्याचे त्याने आपला भाऊ सोहेल खान यालाही सांगितले.

तिथे एक स्पॉटबॉय होता, ज्याने माझे 8 दिवसांचे पैसे कापले होते. मी तिथे रात्रंदिवस दुहेरी शिफ्टमध्ये काम केले, मात्र माझे स्वत:चे पैसे मिळाले नसल्याचे सांगून त्याने माझे पैसे कापले. मी त्यावेळी 25 हजार रुपये कमावत असे. मी मेकअपमन आणि बाकीच्यांना सांगितले की त्या स्पॉटबॉयने माझे पैसे कापले आहेत. सर्वांनी मला सलमान भाईकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. मी म्हणालो की मी सलमानच्या फिल्म युनियनमध्ये का तक्रार करू? याचा विचार करून मी 2017-18 मध्ये ते प्रोडक्शन हाऊसच सोडले. दोन वर्षांपूर्वी मी इमी प्रॉडक्शन जॉईन केले. त्यावेळी मरजावां हा चित्रपट चालू होता. त्यानंतर मी मुघलसह दोन चित्रपटांमध्ये काम केले. तिथेही रणजीत नावाच्या स्पॉटबॉयने त्याच्या नातेवाईकांना घेऊन मला बाहेर काढण्याचा कट रचला.

खोटे आरोप लावून सेटबाहेर हाकलले
एके दिवशी मी शूटिंग करताना खूप थकलो होतो आणि माझे डोळे लाल झाले होते. त्या स्पॉटबॉयने मॅनेजरकडे तक्रार केली आणि सांगितले की मी दारूच्या नशेत सेटवर आलो आहे. मला बाहेर काढाले जावे, असे त्याला वाटत होते. मॅनेजरने मला बोलावून सांगितले, दुबे, तू दारु प्यायला आहे, मी स्पष्टीकरण दिले.

पण तरीही मला हाकलून देण्यात आले. मी खूप विनवण्या केल्या की, मला माफ करा, मग ते म्हणाले की, तुला माफी नाही फाशी द्यायला हवी. माझे कुणी ऐकले नाही. मला काढून टाकण्यात आले, हा सर्व माझ्या सोबतच्या लोकांचा कट होता. आज जेव्हा मी सेटवर जातो तेव्हा प्रत्येक स्पॉट मॅनेजर मला काका म्हणून हाक मारतात.

घर देखील पाडण्यात आले

मी माझी झोपडी 1993 मध्ये बांधली होती, पण ते घरही पाडण्यात आले. वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगरमध्ये मी घर बांधले होते. मुलांचीही लग्ने लावून दिली. 2014मध्ये माझ्या पत्नीला मणक्याचा त्रास सुरु झाला. त्यावेळी घरांचे सर्वेक्षण सुरू होते. मी माझ्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये होतो, त्यामुळे सर्वेक्षण करता आले नाही, तर घर पाडण्यात आले. आम्हाला घरातील सामान काढण्याची संधीही देण्यात आली नाही आणि तसेच घर तोडले. पुन्हा बनवण्याचा विचार आला तेव्हा तिथे मेट्रोचे काम सुरू झाले.

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यांनी मला पत्रही दिले. पण घर मिळाले नाही. फक्त अनेक आश्वासने मिळाली. ज्या लोकांचे घर पाडले गेल, ते लोक आता न्यायालयीन केस लढत आहेत. एक माणूस कोर्टात जाण्यासाठी लोकांकडे 1-2 लाख रुपये मागत होता, म्हणून मी केस केली नाही. आता मी खारमध्ये भाड्याच्या घरात राहतो.

लॉकडाऊनमध्ये माझी परिस्थिती खालावली
माझे आयुष्य असेच सुरु आहे. गेल्या दीड महिन्यापासून माझ्याकडे काम नाही. लॉकडाऊनमध्येही माझी परिस्थिती खूप वाईट झाली होती. अनेकांशी बोललो, अनेक ठिकाणी बातम्याही गेल्या, पण कोणीही मदत केली नाही. एकदा युनियनकडून मदत मिळाली. तेथून 3 हजार रुपयांची मदत मिळाली आणि दीड हजारांचे रेशन आले. ते अमिताभ बच्चन किंवा सलमान खान यांनी दिल्याचेही कळले होते. त्याशिवाय कुठूनही मदत मिळाली नाही. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणेही शक्य नव्हते, कोणाची मदत कशी घ्यावी. मला कोणाकडून काही पैसे मिळाले असते तर मी नीट जगू शकलो असतो. लॉकडाऊननंतर मी काही जाहिरातींसाठी स्पॉटबॉट म्हणून काम केले.

बातम्या आणखी आहेत...