आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्सच्या लाइफ पार्टनर्सचे प्रोफेशन:कुणी चालवतो एनजीओ तर कुणाचा आहे हि-यांचा व्यवसाय, हे आहेत बॉलिवूड सेलेब्सच्या जोडीदारांचे व्यवसाय

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत ज्यांचे पार्टनर यशस्वी उद्योजक आहेत.

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिला AD 100 च्या यादीत स्थान मिळाले आहे. गौरी एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलेब्सच्या घरांची रचना तिने केली आहे. गौरी मुंबईत डिझायनर स्टोअर देखील चालवते. शाहरुखशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत ज्यांचे पार्टनर यशस्वी उद्योजक आहेत.

सुझान खान

अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान ही देखील इंटिरियर डिझायनर आहे. चारकोल प्रोजेक्ट नावाचे तिचे डिझाइन स्टोअर आहे. राणी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा यांच्या घराची ती इंटिरियर डिझायनर आहे. ती गौरी खानबरोबर फर्निचर लाइन चालवते. बिपाशा बासू आणि मलायका अरोरासमवेत तिने 'द लेबल लाइफ' नावाने क्लोदिंग लाइन सुरु केली आहे.

ट्विंकल खन्ना

ट्विंकल देखील एक यशस्वी इंटिरियर डिझायनर आहे. ती व्हाइट विंडोच्या डिझायनर स्टोअरची संस्थापक आहे. याशिवाय ट्विंकल लेखिका देखील आहे.

सीमा खान

सोहेल खानची पत्नी सीमा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ती सुझान खानसमवेत लक्झरी कॉन्सेप्ट रिटेल बुटीकची सह-मालक आहे. याव्यतिरिक्त, ती ब्यूटी स्पा आणि सलून कॅलिस्टाची मालकीण आहे.

माना शेट्टी

सुनील शेट्टी यांची पत्नी माना ही एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. ती 'सेव्ह द चिल्ड्रन इंडिया' ही स्वयंसेवी संस्था चालवते. याशिवाय ती रिअल स्टेट व्हेंचर S2.21 लक्झरी व्हिलाची मालकीण आहे. 'माना अँड ईशा' नावाच्या कपड्यांचा ब्रँडही ती चालवते.

राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा हे देखील ब्रिटनमधील एक खूप मोठे उद्योगपती आहेत. राज यांनी आपला व्यवसाय शाल विकून सुरू केला होता पण आता ते मोठे हिरा व्यापारी आहेत.

जय मेहता

जुही चावलाचे पती जय मेहता मेहता ग्रुप या मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत. यासह त्यांच्या दोन सिमेंट कंपन्या आहेत. शाहरुख खानसमवेत ते आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक आहेत.

बातम्या आणखी आहेत...