आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना प्रकरणात दिलजितला सेलिब्रिटींचा पाठिंबा:प्रकाश राज म्हणाले -'तू तर रॉकस्टार आहेस', कंगनाला उद्देशून स्वरा म्हणाली - 'आज तुला दिलजितने पंजाबीमध्ये समजावले'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भांडणात बॉलिवूड कलाकारांनी दिलजितला आपला पाठिंबा दर्शवला असून कंगनावर टीका केली आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रनोट आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यातील सोशल मीडिया वॉर सुरु झाले आहे. एकीकडे कंगनाने शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधआन केले, तर दुसरीकडे दिलजितने शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांजने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी करत कंगनाला सुनावले होते. त्यावर कंगनाने दिलजीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तर दिलजितनेही तिला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान या भांडणात बॉलिवूड कलाकारांनी दिलजितला आपला पाठिंबा दर्शवला असून कंगनावर टीका केली आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी दिलजितला आपला पाठिंबा दर्शवला. त्यांनी 'तू रॉकस्टार आहेस', असे म्हणत दिलजितचे कौतुक केले आहे.

तर दुसरीकडे स्वरा भास्कर हिनेदेखील कंगनाचा चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय. 'मी बोलले होते तुला की तू थकशील... आज तुला दिलजितने पंजाबीमध्ये समजावले आहे. आता तरी त्याची माफी माग', अशा आशयाची पोस्ट स्वराने टाकली आहे.

याशिवाय कुणाल कामरा, कुब्रा सैत, फराह खान, गिंपी गरेवाल, हिमांशी खुराना यासह अनेक कलाकांनी कंगनाची खिल्ली उडवत दिलजितला पाठिंबा दिला आहे.

गिंपी गरेवालची सोशल मीडिया पोस्ट

हिमांशी खुरानाची सोशल मीडिया पोस्ट

फराह खानची सोशल मीडिया पोस्ट

कंगना आणि दिलजित यांच्यातील सोशल मीडिया वॉर

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांजने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती. त्यावर कंगनाने दिलजितवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. ''तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रनोट आहे, तुझ्यासारखी चमची नाही,'' अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली.

कंगनाच्या या ट्विटला दिलजित यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. ''तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते'', असे दिलजितने म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser