आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भन्साळी प्रोजेक्ट:‘इन्शाअल्लाह’साठी शाहरुखने दिला नकार, हृतिकला मिळू शकते भूमिका

मुंबई22 दिवसांपूर्वीलेखक: अमित कर्ण
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वी सलमानसोबत करणार होता हा चित्रपट...

संजय लीला भन्साळीने पुन्हा एकदा चित्रपट ‘इन्शाअल्लाह’ वर काम सुरू केले आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी सलमान खान व आलिया भट्टसोबत होणार होता. मात्र ऐनवेळी सलमान व भन्साळी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने हा प्रकल्प डब्यात गेला. यानंतर भन्साळीने तो पुन्हा शाहरुख खान आणि आलिया भट्टसोबत सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे झाले नाही. आता भन्साळीने या चित्रपटासाठी हृतिक रोशनशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर भन्साळीला ‘हीरामंडी’साठीही आलियाला साइन करायचे आहे.

‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’तील संघर्षामुळे आली होती कटुता
ट्रेड पंडितांनी सांगितले, शाहरुख आणि आलिया यांचे संबंध चांगले आहेत. मात्र, भन्साळीसोबत शाहरुखच्या संबंधात ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’तील संघर्षामुळे कटुता आली होती. यामुळेच शाहरुख भन्साळीसोबत काम करायला तयार नाही. दोन वर्षांपूर्वी “इन्शाअल्लाह’चे चित्रीकरण स्थगित झाल्याने ५-६ दिवसांतच भन्साळीने “गंगूबाई’वर काम करणे सुरू केले होते. एका वेळी एकच प्रकल्प करणारा भन्साळी आता “गंगूबाई’चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर “इन्शाअल्लाह’वर करत आहे.

याआधीही वयातील अंतरावरील चित्रपटात काम केलंय आलियाने
या चित्रपटात भन्साळीला वयातील अंतराबाबतीत कथा दाखवायची आहे. यामुळेच आलियापेक्षा मोठ्या कलाकाराला घ्यायचे आहे. आलियाने याआधीही वयातील अंतरावरील चित्रपट केले आहेत. अशाच प्रकारचा चित्रपट ‘हायवे’त ती रणदीप हुडासोबत दिसली होती तर ‘डिअर जिंदगी’मध्ये तिच्यासोबत शाहरुख होता.

काहीशी अशी आहे चित्रपटाची कथा
चित्रपट ‘इन्शाअल्लाह’बाबत भन्साळी खूप उत्साहित आहेत. यासाठी लंडन व लॉस एंजलिसमध्ये पाहणीही केली आहे. चित्रपटात आलियाचे पात्र बनारसचे आहे, तर नायक अमेरिकेतील एक उद्योगपती आहे. आलियाच्या पात्राला नृत्यांगना होण्याची इच्छा असून एका कार्यक्रमात तिची भेट नायकासोबत होते. येथून दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात होते.

बातम्या आणखी आहेत...