आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूड:सेटवरून मेकअपमनची होऊ शकते सुटी, स्टार्सची फीस अर्ध्यावर येईल, तिकीट विक्री ऑनलाइन, प्रत्येक शोनंतर हॉलचे निर्जंतुकीकरण होईल 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • बॉलीवूडमध्ये कसे होईल शूटिंग, आगामी काळात कसे असेल सिनेमाचे रूप -वाचा वृत्तांत

मनीष भल्ला 

कोविड-१९ च्या संसर्गकाळात शूटिंगच्या पद्धती बदलण्याची तयारी बॉलीवूडमध्ये सुरू आहे. जेणेकरून शूटिंगला परवानगी मिळताच या नव्या सुरक्षित पद्धतीने काम सुरू करता येईल. दक्षिण भारतातील एका मोठ्या सिनेमा कंपनीचे एमडी रुबन माथीवानन यांनी सांगितले की, देशातील सर्व थिएटर मालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगची तयारी केली आहे. यात सर्व तिकिटांची ऑनलाइन किंवा बारकोड पद्धतीने होईल. हॉलमध्ये एक-दोन आसने सोडून बसण्याची व्यवस्था राहील. प्रत्येक शोनंतर थिएटरचे निर्जंतुकीकरण होईल. 

चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहटा सांगतात की, थिएटर सुरू झाले तरी सुरुवातीला ३० टक्केच लोक येतील. मध्यम आणि कमी बजेटचे चित्रपटच थिएटरमध्ये रिलीज होतील. ३० टक्के प्रेक्षकांसाठी मोठ्या बजेटचे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतील की नाही याबाबत शंका आहे. नाहटा म्हणतात की, चित्रपटाच्या खर्चात ६० ते ७० % हिस्सा कलावंतांचे मानधन असते. मात्र, आता ते ५०% नी कमी होईल. मात्र, स्टारच्या नफ्यातील वाट्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. नव्या नियमांनुसार काम करणे आणि सरकारला ते पटवून देणे यावर सिने व टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) काम करते आहे. सिंटाच्या कार्यकारी समितीचे सदस्य सुशांत सिंह म्हणाले की, सेटवर १० ते २० लोकच राहतील असे आम्ही ठरवले आहे. 

कलावंत मेकअप व हेअर स्टाइल घरूनच करून येतील. एका निर्मात्याने सांगितले, सहायक हेअर स्टायलिस्ट, मेकअपमॅनच्या मानधनात मोठी कपात होऊ शकते. सध्या हेअर स्टायलिस्ट सेटवर येण्यासाठी ४०,००० ते एक लाख रुपये घेतात.  इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असो.चे अध्यक्ष टी. पी. अग्रवाल म्हणाले, आम्ही अमेरिका, युरोपात शूटिंगला जातो तेव्हा ३० टक्के क्रू घेऊन जातो. आता हा नियम भारतातही लागू राहील. 

हे बदलही होऊ शकतात

- थिएटर आता ऑनलाइन तिकीट विक्रीच्या तयारीत. आसनांत अंतर राहील.  - सिंटानुसार, शूटिंगवेळी सेटवर १० ते २० आवश्यक लोकच असतील.  - ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक सेटवर नसतील. निर्माते सेटवर मास्क आणि सॅनिटायझर देतील. - थिएटरमध्ये सीटवरच खाण्याची ऑर्डर देणे अनिवार्य राहील. - ओटीटीला सेन्सॉरच्या कक्षेत आणले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...