आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोमन इराणी यांचे OTTवर पदार्पण:'मासूम'बद्दल एक्साइटेड आहेत बोमन इराणी, 17 जून रोजी रिलीज होणार वेब सिरिज

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोमन इराणी आणि समारा तिजोरी स्टारर ही वेब सिरिज डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी अलीकडेच त्यांच्या डिजिटल पदार्पणाची घोषणा केली होती. 'मासूम' या सिरिजद्वारे बोमन वयाच्या 62 व्या वर्षी ओटीटीवर पदार्पण करत आहेत. बोमन यांनी वेब डेब्यूबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या प्रोजेक्टबद्दल खूप एक्साइटेड असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सहा भागांची असेल ही सिरिज

ही सिरिज पंजाबमधील फलौली येथील कपूर कुटुंबाच्या जीवनातील अकथित सत्ये उलगडून दाखवेल, ज्यामध्ये जटिल नातेसंबंधांची गतिशीलता काळ आणि महत्त्वाकांक्षेनुसार बदलते. 6 भागांची ही सिरिज 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यात बोमन इराणी यांच्यासोबत नव्या दमाची अभिनेत्री समारा तिजोरी मुख्य भूमिकेत असून वडील आणि मुलीमधल्या गुंतागुंतीच्या नात्याची झलक यातून पाहायला मिळणार आहे. यांच्यासह मंजरी फडणीस, वीर राजवंत सिंग, उपासना सिंग आणि मनुर्शी चढ्ढा हे कलाकारदेखील सिरिजमध्ये आहेत.

मिहीर देसाई दिग्दर्शित हॉटस्टार स्पेशल 'मासूम', हे पुरस्कार-विजेती आयरिश सिरिज 'ब्लड'चे हिंदी व्हर्जन आहे. जी कौटुंबिक संबंध आणि कुटुंब गमावल्यानंतर झालेल्या विश्वासघातावर प्रकाश टाकते. या शोची निर्मिती ड्रीमर्स अँड डोअर्स कंपनीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

मला प्रगल्भ होण्यास मदत झाली

बोमन इराणी म्हणाले, “मी डिस्ने+ हॉटस्टारवरील 'मासूम'सोबत डिजिटल क्षेत्रात पदार्पण करतो आहे, जे या वर्षी माझ्या काही आवडत्या सिरिज तयार करत आहेत. ही सिरिज ही एक खिडकी आहे, जी माझ्यासाठी नवीन जग उघडणार असून मला मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवणार आहे. माझी रील लाइफ मुलगी समारा हिच्यासोबत तिच्या वडिलांची भूमिका करणे खूप आव्हानात्मक होते, कारण ती खूप हिंमतबाज मुलगी आहे. समारासारख्या ताज्या प्रतिभेच्या आणि अत्यंत हुशार कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. एका तरुण अभिनेत्याचा अभिनय साकारताना प्रत्यक्ष पाहणे, माझ्यासाठी आनंददायक होते आणि त्यामुळे, एकप्रकारे मला देखील प्रगल्भ होण्यास मदत झाली.”

अभिनेत्री समारा तिजोरी म्हणाली, "मासूममध्ये, मी एका तरुण मुलीची भूमिका साकारत आहे जी सत्य समोर आणण्याच्या प्रयत्नात असते जेव्हा तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला ते दाबून टाकायचे आहे. बोमन इराणी माझ्या ऑन-स्क्रीन वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत ही भूमिका साकारणे हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. एका अनुभवी अभिनेत्यासोबत तसेच, अनुभवी कलाकार आणि क्रू सोबत काम केल्यामुळे, मी एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून विकसित झाले आहे. मला आशा आहे की या कथेचा वेग आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवेल."

बातम्या आणखी आहेत...