आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीची घटना:बोमन इराणी यांच्या बहिणीच्या घरी कोट्यवधींची चोरी, बंगळुरुतून आरोपींना अटक

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही महिला खुर्शीद यांच्या घरी काम करायची.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची बहीण खुर्शीद इराणी यांच्या घरी कोट्यवधींची चोरी झाल्याची घटना घडली आहे. बंगळुरु पोलिसांनी आरोपी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी खुर्शीद इराणी यांच्या घरातून तब्बल एक कोटी रुपयांचे दागिने आणि 11 लाख रुपये रोख चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु असताना आरोपी महिलेला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे. ही महिला खुर्शीद यांच्या घरी काम करायची.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी महिलेचे नाव मेरी अ‍ॅलिस असे आहे. ती गेल्या पाच वर्षांपासून खुर्शीद यांच्या घरी काम करत होती. काही दिवसांपूर्वी खुर्शीद यांच्या घरी चोरी झाली. विशेष म्हणजे चोरी झाल्यापासून घरकाम करणारी मेरीदेखील कामावर येत नव्हती. परिणामी पोलिसांचा संशय तिच्यावरच गेला. आणि पोलिस तिचा शोध घेऊ लागले. अखेर मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने बंगळुरु येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत तिचा 22 वर्षांचा मुलगा मायकल देखील होता. आरोपींकडून एक कोटी रुपयांचे दागिने आणि 11 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

सध्या आरोपी महिला आणि तिचा मुलगा पोलिस कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...