आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्तीसाठी कोर्टात पोहोचले भावंड:राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी मुंबई हायकोर्टात पोहोचले रणधीर आणि रीमा, कोर्ट म्हणाले - पहिले राजीव यांच्या घटस्फोटाचे पेपर्स जमा करा

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपूर कुटुंबीयांकडे नाहीत घटस्फोटाचे पेपर्स

रणधीर कपूर यांचे सर्वात लहान भाऊ राजीव कपूर यांचे 9 फेब्रुवारी 2021 रोजी निधन झाले. ते घटस्फोटित होते आणि त्यांना मुलबाळही नव्हते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचे प्रकरण कोर्टात आहे. सोमवारी यावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. रणधीर कपूर आणि त्यांची बहीण रीमा जैन या दोघांनी राजीव कपूर यांच्या संपत्तीवर आपला हक्क असल्याची याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली होती. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने या दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने म्हटले - घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात जमा करा
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी रणधीर कपूर आणि रीमा जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. राजीव कपूर यांनी 2001 मध्ये आरती सबरवाल यांच्याशी लग्न केले होते आणि 2003 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला होता. त्यांना मुलबाळही नव्हते. त्यामुळे राजीव यांची मालमत्ता कपूर घराण्याच्या नावी केली जावी, असे रणधीर आणि रीमा यांनी आपल्या याचिकेत म्हचले आहे. यावर कोर्टाने त्यांना राजीव यांच्या घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले.

कपूर कुटुंबीयांकडे नाहीत घटस्फोटाचे पेपर्स
यावर रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील शरण जगतियानी यांनी कोर्टात सांगितले की, राजीव कपूर आणि आरती सबरवाल यांच्या घटस्फोटाचे पेपर्स त्यांच्याकडे नाहीत आणि या दोघांनी कोणत्या फॅमिली कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला हे त्यांना माहिती नाही. राजीव कपूर यांच्या संपत्तीचे हे दोघेजण वारस आहेत. त्यांच्याकडे राजीव यांच्या घटस्फोटाचे पेपर्स नाहीत. परंतु ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती सापडली नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना हे पेपर्स सादर करण्यामध्ये मुभा द्यावी अशी विनंती केली. या दोघांचा घटस्फोट मुंबई कोर्टात झाला की दिल्ली कोर्टात याचीही माहिती या दोघांना नसल्याचेही वकिलांनी कोर्टात सांगितले.

यावर न्यायमूर्ती गौतम यांनी सांगितले की, या दोघांच्या घटस्फोटाचे पेपर्स सादर करण्यात सूट देण्यास कोर्ट तयार आहे, परंतु त्यासाठी या दोघांनी तसे स्वीकृती पत्र द्यावे असे सांगत या प्रकरणावरील सुनावणी स्थगिती केली.

बातम्या आणखी आहेत...