आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना विरुद्ध शिवसेनेचा 7 वा दिवस:ऑफिस तोडल्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी 22 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली; कंगनाने तुटलेल्या ऑफिसची केली पाहाणी, बीएमसीकडून क्वारंटाइनमधून मिळाली सूट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना बुधवारी हिमाचलहून मुंबईत पोहोचली होती. त्यापूर्वीच बीएमसीने तिच्या मुंबईस्थित ऑफिसवर हातोडा मारला.
  • या कारवाईविरोधात कंगना उच्च न्यायालयात गेली, कोर्टाने कारवाईला स्थगिती दिली आणि म्हटले - जर एवढा वेग आणि जागा दाखविली असती तर मुंबई काही वेगळी असती

अभिनेत्री कंगना रनोट हिचे कार्यालय तोडण्याच्या प्रकरणात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, या कारवाईसंदर्भात बीएमसीने न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे. हे उत्तर वाचण्यासाठी कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी वेळ मागितला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

बुधवारी कंगना हिमाचलहून मुंबईत दाखल झाली. ती मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पाली हिल्सस्थित तिच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या ऑफिसवर बेकायदा बांधकामे हटवण्याची कारवाई महापालिकेने केली होती. याविरोधात कंगना उच्च न्यायालयात गेली होती आणि कोर्टाने कारवाईवर स्टे आणला होता.

  • ऑफिसची पाहणी करायला पोहोचली कंगना

दरम्यान आज कंगना दुपारी तिच्या ऑफिसची पाहणी करायला पोहोचली होती. त्यापूर्वी तिची थोरली बहीण रंगोलीने ऑफिसमध्ये तोडफोडीचा आढावा घेण्यासाठी पोहोचली होती.

  • कंगनाला बीएमसीकडून क्वारंटाइनमधून सूट

कंगना बुधवारी हिमाचलमधून मुंबईत दाखल झाली. नियमानुसार, दुस-या राज्यातून आलेल्या व्यक्तीला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवले जाते. मात्र हा नियम कंगनासाठी क्षितील करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमधून मुंबईत आलेल्या कंगनाला क्वारंटाइनमधून सूट देण्यात आली आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार कंगना केवळ चारच दिवसांसाठी मुंबईत आली आहे. शिवाय हिमाचलमधून येताना तिने तिची कोरोना चाचणी केली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळेच तिला प्रवास करण्याची संमती देण्यात आली. त्यामुळे चार दिवसांसाठी मुंबईत आलेल्या कंगनाला मुंबई महापालिकेने क्वारंटाइनमधून सूट दिली आहे.