आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचे प्रकरण:सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, महापालिकेची कारवाई योग्य असल्याचे सांगत याचिका फेटाळली

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच शक्ती सागर इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आहे. - Divya Marathi
याच शक्ती सागर इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आहे.
  • लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने याच इमारतीत स्थलांतरितांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती.

मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीस विरोधात अभिनेता सोनू सूदच्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. मात्र यावेळी सोनूला न्यायालयाकडून दणका बसला आहे. महापालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. झालेल्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. सोनूने अ‍ॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज त्यावर सुनावणी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
जुहू येथील एबी नायर रोडवरील सहा मजली शक्ती सागर इमारतीचे आवश्यक त्या परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आरोप आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, “सोनू सूदने स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केले. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

बीएमसीने सोनू सूदवर नोटिसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला. सिव्हिक अथॉरिटीने सांगितल्यानुसार, नोटिस दिल्यावरही सोनू सूद अनधिकृत निर्माण करत राहिला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने याच इमारतीत स्थलांतरितांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती.

बातम्या आणखी आहेत...