आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bombay High Court Grants Interim Relief To Raj Kundra And Keeps His Anticipatory Bail Application For Hearing Next Wednesday, 25th August

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण:मुंबई उच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला अंतरिम दिलासा, जामीन अर्जावर 25 तारखेला होणार सुनावणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या पोर्नोग्राफी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्या 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी राजला अटक केली होती. आता राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याच्या अटकपूर्व जामीन अर्ज येत्या बुधवारपर्यंत म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत सुनावणीसाठी राखून ठेवला आहे.

या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेया प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. ही टीम फक्त पोर्नोग्राफी रॅकेटशी संबंधितच तपास करणार आहे. या एसआयटीचे नेतृत्व एसीपी दर्जाचा अधिकारी करणार आहे. ही टीम गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना अहवाल सादर करेल. याप्रकरणामध्ये राज कुंद्रा हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे. सध्या त्याला ऑर्थर रोज कारागृहात ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी केला होता राज कुंद्राच्या जामीनाला विरोध
राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती, जी पुढे ढकलण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आणि न्यायालयाला सांगितले होते की, त्याला जामीन दिल्यास समाजाला चुकीचा संदेश जाईल. राज कुंद्राची जामिनावर सुटका झाल्यास तो पुन्हा तोच गुन्हा करू शकतो आणि देश सोडून पळून जाऊ शकतो असेही पोलिसांनी म्हटले होते. ज कुंद्राकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे पोलिसांनी हे सांगितले होते.

याआधी जामीन अर्ज फेटाळला होता
राज कुंद्राने जामिन मिळावा यासाठी 28 जुलै रोजी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. या प्रकरणात सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रयान थोरपे यांनी वकिलांमार्फत याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. अटक करण्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले होते. त्याचबरोबर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला रिमांड बेकायदेशीर असल्याचेही म्हटले होते. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावली झाली होती. ‘महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली कोठडी कायद्याला अनुसरून आहे आणि त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नाही,’ असे सुनावत न्यायालयाने राजची ही याचिका फेटाळून लावली होती.

या कलमांखाली राजला झाली अटक
राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थोरपे याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार होती. रायनच्या जामीन अर्जावरही निर्णय आता 20 ऑगस्टलाच येईल. राज कुंद्राच्या विरोधात आयपीसी कलम 292, 296 अश्लिल व्हिडिओ बनवणे, विकणे, कलम 420 लोकांचा विश्वासघात करणे,सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत कलम 67, 67अ, अश्लिल व्हिडिओ चित्रीत करणे आणि ते ऑनलाइन शेअर करणे, सामग्री करणे आणि प्रसारित करणे, कलम 2 जी, 3, 4, 6, 7 महिलांवर अश्लिल फिल्म बनवणे, ते विकणे आणि प्रसारित करणे या कलमांतर्गंत अटक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...