आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bombay High Court Said Reporting Done According To Police Sources Is Not Defamation, The Court Considered That It Is Necessary To Maintain Shilpa's Right To Privacy

शिल्पा शेट्टी मानहानी प्रकरण:मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले - सूत्रांच्या हवाल्याने तपासाशी संबंधित गोष्टी लिहिणे बदनामी नाही, वार्तांकन करताना शिल्पाच्या गोपनीयतेचीही काळजी घेतली गेली पाहिजे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाचे वकील म्हणाले - माध्यमांच्या वार्तांकनाचा मुलांवर परिणाम होतोय

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 29 मीडिया हाऊससह अन्य लोकांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायलयात दीर्घ युक्तीवाद चालला. दरम्यान, न्यायालयाकडून शिल्पाला कोणताही दिलासा मिळाला नाही आणि मीडिया रिपोर्टिंगवरही कोणते बंधन घातले गेले नाही. पण काही यूट्युब व्हिडिओ अहवालांवर शंका उपस्थित केली गेली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, सूत्रांच्या हवाल्याने तपासाशी संबंधित माहिती लिहिणे किंवा प्रसारित करणे बदनामीकारक नाही. पण सोबतच, एखाद्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या मुलांच्या संगोपनाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिल्पा शेट्टीने अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

न्यायालयाने म्हटले की, शिल्पा शेट्टीच्या गोपनीयतेचा हक्क अबाधित ठेवावा लागेल. या संपूर्ण प्रकरणात शिल्पाची मुले आणि त्यांचे संगोपन याबद्दल बोलता येणार नाही. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पाच्या वकिलाला प्रश्न विचारला की, जर माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या चालवत असतील तर ते कसे चुकीचे आणि बदनामीकारक आहे? न्यायालयाने शिल्पाच्या वकिलांना म्हटले की, 'तुमच्या क्लायंटच्या पतीविरोधात एक खटला चालवला जातोय आणि हे कोर्ट त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. मग तुमचा क्लायंट कुणीही असू शकतो, पण मानहानीसाठी एक कायदा आहे.'

यावेळी एका बॉलिवूड वेबसाईटचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, त्याचा थेट संबंध राज कुंद्राविरुद्ध सुरू असलेल्या तपासाशी आहे. अहवाल म्हणतो की, शिल्पावर पुरावे नष्ट केल्याचा संशय आहे. हा अहवाल तपास एजन्सीच्या अंडरस्टँडिंगने लिहिला गेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसते. हे वार्तांकन शिल्पाच्या निर्दोषतेवर किंवा अपराधावर नाही, तर ते पोलिसांच्या निरीक्षणावर आधारित आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

शिल्पाचे वकील म्हणाले - माध्यमांच्या वार्तांकनाचा मुलांवर परिणाम होतोय
शिल्पाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित होणाऱ्या अहवालांचा तिच्या (शिल्पा शेट्टी) मुलांवर परिणाम होतोय. काही गोष्टी पत्रकाराच्या वागणुकीचा भाग आहेत. मी पत्रकारांच्या दर्जावर भाष्य करू शकत नाही. मात्र पत्रकार मानकांचे पालन करत नाहीत, असे वकिलांनी म्हटले.

यावर कोर्टाने वकीलांना प्रश्न विचारला की, आता कोर्टाने प्रत्येक रिपोर्टसाठी मीडिया हाऊसद्वारे कोणत्या सूत्रांचा हवाला दिला गेला, याची चौकशी करत बसावे का? न्यायालयाने म्हटले की, पोलिस सूत्रांच्या आधारे नोंदवलेली कोणतीही गोष्ट बदनामीकारक नाही.

न्यायालयाने काय म्हटले?
'ते (राज कुंद्रा) दोषी आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही. आम्ही याबद्दल काहीच बोलत नाही. परंतु तपासादरम्यान गुन्हे शाखा काय म्हणत आहे किंवा पोलिस काय म्हणत आहेत याचे वार्तांकन करणे ही बदनामी असू शकत नाही. ज्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे त्यांनाही संधी मिळायला हवी,' असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर शिल्पाच्या वकिलांनी सांगितले की, राज कुंद्राच्या प्रकरणात काही माध्यमे त्यांची आई, मुलांचे आणि कुटुंबाचे नाव ओढत आहेत. न्यायालयाने दोन यूट्यूब चॅनल्सच्या मालकांना 20 सप्टेंबर रोजी या प्रकरणी उत्तर देण्यासाठी समन्स बजावले आहे.

शिल्पा शेट्टीने काही मीडिया हाऊसवर प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा अश्लील चित्रपट निर्मिती व वितरणाच्या आरोपात अटकेत आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीने पॉर्नोग्राफी प्रकरणात 29 मीडिया हाऊससह यूट्यूब वाहिन्यांवर 25 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावर आज (शुक्रवार, 30 जुलै) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

शिल्पाने याचिकेत काय म्हटले?
शिल्पाने आपल्या या याचिकेत अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर प्रतिक्रिया दिल्याची आणि या प्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आल्याची अनेक उदाहरणे सादर केली आहेत. अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि 25 कोटी रुपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. शिल्पाने फेसबुक, यूट्युब आणि इन्स्टाग्रामविरोधातही खटला दाखल केला आहे. या प्रकरणात आपल्याला अपराधी असल्याचे दाखवण्यात आले असून पती राज कुंद्रांवर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिले असल्याचे देखील चुकीचे वार्तांकन करण्यात आले असल्याचे तिने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...