आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाच्या याचिकेवर निर्णय:मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला 8 जानेवारी रोजी वांद्रा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अभिनेत्री कंगना रनोटच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने 8 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत कंगनाला वांद्रा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. न्यायाधीश एसएस शिंदे यांच्या खंडपीठाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे की, "याचिकाकर्त्यांना (कंगना आणि तिची बहीण रंगोली) वेळ देण्यात येतेय. त्यांना या काळात अटक होणार नाही. जानेवारीत त्यांनी चौकशीसाठी हजर राहावे."

कंगना रनोट आणि तिची मोठी बहीण रंगाेली चंदेल यांनी साेमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुंबई पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. कंगनाच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी ही याचिका दाखल केली. मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी दोन्ही बहिणींवर देशद्रोह, द्वेष पसरवणे आणि इतर कलमांसह एफआयआर नोंदवला आहे.

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितल्यानुसार, कंगना आणि रंगोली यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पोलिसांनी चौकशीसाठी जे समन्स बजावले आहे त्यावर स्टे आणला जावा आणि त्यांच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई केली जाऊ नये, अशी अपील केली.

पोलिसांनी दोन्ही बहिणींना तीनदा समन्स बजावले
पोलिसांनी 18 नोव्हेंबरला तिसऱ्यांदा नोटीस बजावून कंगनाला 23 आणि रंगोलीला 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. कंगनला 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत हजर राहण्यास सांगितले हाेत. पण त्या दोन बहिणी साेमवारी हिमाचल प्रदेशात होत्या. यापूर्वी कंगनाला 26 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. भावाच्या लग्नाला हजर राहण्याचे कारण देऊन कंगनाने 15 नाेव्हेंबरला चाैैकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले हाेते. न्यायालयाच्या आदेशाने दाेघींच्या विराेधात वांद्रे पाेलिस ठाण्यात 17 ऑक्टाेबरला एफआयआर दाखल केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कंगना आणि तिच्या बहिणीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करत दोन समुदायात द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. कंगनाने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगनाविरोधात याचिकाकर्त्याचे हे आहेत आरोप

कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.

कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser