आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनटाइटल्ड फिल्म:लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीरच्या आईवडिलांची भूमिका साकारणार डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भूमिकेसाठी अर्जुनने आपल्या वडिलांचे मन वळवले

दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर शनिवारी नोएडा येथे दाखल झाले. वृत्तानुसार, लव रंजनच्या अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात डिंपल आणि बोनी अभिनेता रणबीर कपूरच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांना या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे एक शेड्युल स्पेनमध्ये सुरु करायची इच्छा होती. पण कोविडमुळे निर्मात्यांना स्वदेशी देशातच चित्रीकरण सुरू करावे लागले.

या भूमिकेसाठी अर्जुनने आपल्या वडिलांचे मन वळवले
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात रणबीर कपूरचे वडील एक श्रीमंत आणि आत्मविश्वासू व्यक्ती आहेत. चित्रपटाच्या लेखकांनी बोनी कपूर यांनी ही व्यक्तिरेखा साकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा निर्मात्यांनी याबद्दल बोनी कपूरशी चर्चा केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता. यानंतर, लव रंजन यांनी अर्जुन कपूर त्यांचे मन वळवण्यासाठी सांगितले होते.

अर्जुन व्यतिरिक्त अंशुला, जाह्नवी आणि खुशी यांनीही त्यांच्या वडिलांना चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी राजी केले. शेवटी बोनी कपूर यांनी यावर सहमती दर्शविली. बोनी कपूर सध्या हैदराबादमध्ये शूटिंग करत असून सोमवारी चित्रपटाच्या सेटवर पोहोचेल. बोनी कपूर यांनी अलीकडेच रिलीज झालेल्या अनिल कपूर स्टारर AK VS AK या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

डिंपल कपाडिया साकारणार रणबीरच्या आईची भूमिका
या चित्रपटात बोनी कपूरच्या पत्नीची भूमिका डिंपल कपाडिया साकारणार आहेत. रणबीर कपूर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात देखील दिसणार आहे. यात तो पहिल्यांदाच गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser