आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिलासा:बोनी कपूर यांच्या घरातील तीन सदस्यांची कोरोनावर मात, बोनी कपूर यांनी लिहिले - 'आता आम्ही नवी सुरुवात करण्यास सज्ज आहोत'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोनी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.

बोनी कपूर यांच्या घरात काम करणा-या तीन सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता दिलासादायक बातमी म्हणजे या तिघांनीही कोरोनाचा पराभव केला आहे. याची माहिती स्वतः बोनी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला हे कळवताना अतिशय आनंद होतोय की, आमचे तीन स्टाफ सदस्य ज्यांना कोविड 19 ची लागण झाली होती, ते आता बरे झाले असून त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझी आणि माझ्या मुलींची टेस्ट यापूर्वीच निगेटिव्ह आली होती. आमचा 14 दिवसांचा क्वारंटाईन काळदेखील संपला आहे आणि आता आम्ही नवी सुरुवात करण्यास सज्ज आहोत', असे बोनी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.  

बोनी यांनी आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले की, 'या संसर्गामुळे पीडित सर्व लोक लवकरच बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो. इच्छा आहे. इतर सर्वांनी सुरक्षित रहावे आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे.'

आपल्या तिसर्‍या ट्विटमध्ये बोनी यांनी आरोग्य कर्मचा-यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, 'मी आणि माझे कुटुंब डॉक्टर, आरोग्य सेवा कर्मचारी, बीएमसी, मुंबई पोलिस, राज्य आणि केंद्र सरकारला मदतीसाठी आणि सहकार्याबद्दल आभार मानू इच्छितो. आम्ही एकत्रितपणे कोविड 19 या विषाणूवर मात करुयात.'

19 मे रोजी झाले होते कोरोनाची लागण झाल्याचे निदान :  बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या एका सदस्याला 19 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर बोनी यांच्या घरातील आणखी दोन सदस्यांना या विषाणूची लागण झाली होती. हे तिघेही बोनी यांच्याच घरी वास्तव्याला आहेत.

तीन कर्मचा-यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर बोनी यांनी कुटुंबासह स्वत:ला क्वारंटाईन केले होते. बोनी अंधेरी (मुंबई) च्या लोखंडवाला भागात राहतात. याच इमारतीत अभिनेत्री तब्बू आणि टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी यांचेही घर आहे.

0