आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Boney Kapoor Has Reacted To Reports That His Daughter Khushi Kapoor Will Make Her Acting Debut With Zoya Akhtar's Netflix Adaptation Of The Archie Comic

खुशी कपूरच्या पदार्पणावर सस्पेन्स:झोया अख्तरच्या चित्रपटातून मुलगी खुशी कपूरच्या पदार्पणावर बोनी कपूर म्हणाले - 'मला याबद्दल काहीच माहिती नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरं तर बोनी स्वतः आपल्या लेकीला लाँच करु शकतात, पण ते तसे करणार नाहीयेत.

बॉलिवूडमधील बरेच स्टार किड्स झोया अख्तरच्या आगामी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगत आहे. या स्टारकिड्समध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी-बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर यांचा समावेश आहे. असे म्हटले जात आहे की, झोया नेटफ्लिक्ससाठी आर्ची कॉमिक्सचे भारतीय रुपांतर करत आहे, ज्यामध्ये अनेक स्टार किड्स दिसू शकतात.

मात्र, बोनी कपूर यांनी आपल्या मुलीबाबत येणाऱ्या अशा बातम्यांचे खंडन केले आहे. ते म्हणाला, "मला याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही ज्याबद्दल बोलत आहात त्याबद्दल मला काही कल्पना नाहीये.' बोनी यांनी याआधी म्हटले होते की, खुशीला ते नव्हे तर बॉलिवूडमधील इतर कुणी लाँच करतील. खुशीने तिचा स्वतःचा मार्ग शोधावा अशी त्यांची इच्छा आहे. खरं तर बोनी स्वतः आपल्या लेकीला लाँच करु शकतात, पण ते तसे करणार नाहीयेत.

करण जोहर लाँच करू शकतो

बोनी कपूर यांनी संकेत दिले होते की, चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या एका चित्रपटात खुशीला लाँच करू शकतो. सध्या खुशी अमेरिकेत अभिनयाचा कोर्स करत आहे. ती फक्त 20 वर्षांची आहे, पण इतक्या लहान वयात तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास होकार दिला आहे.

जान्हवीची अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरु

खुशीची मोठी बहीण जान्हवीने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटातून पदार्पण केले होते. तेव्हा जान्हवी 21 वर्षांची होती. चित्रपट फारसा चालला नाही पण जान्हवीला एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट मिळत आहेत. या चित्रपटानंतर ती गुंजन सक्सेना आणि नेटफ्लिक्सच्या 'घोस्ट स्टोरीज'मध्ये झळकली होती. 2021 मध्ये ती 'रुही'मध्ये दिसली होती. आता तिचा आगामी चित्रपट 'दोस्ताना 2' हा आहे.

बातम्या आणखी आहेत...