आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस रेकॉर्ड:'भूल भुलैया 2' लवकरच ओलांडणार 200 कोटींचा आकडा, कार्तिक म्हणाला - आता हा सर्टिफाइड ब्लॉकबस्टर चित्रपट

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार आठवड्यांत जमवला 176.14 कोटींचा दल्ला

अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 28 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटाने चार आठवड्यांत केवळ भारतातून 176 कोटींहून अधिकचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.

चित्रपटाने 27 व्या दिवशी 175 कोटींची कमाई केल्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'भूल भुलैया 2' हा चित्रपट आता सर्टिफाइड ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे, असे म्हटले होते. इतकेच नाही तर हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हा चित्रपट 19 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार असल्याचीही बातमी येत आहे.

चार आठवड्यांत जमवला 176.14 कोटींचा दल्ला

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, 65 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 12.99 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 92.05 कोटी, दुस-या आठवड्यात 49.70 कोटी आणि तिस-या आठवड्यात 21.40 कोटींची कामई केली आहे. अशाप्रकारे एकुण चार आठवड्यांच्या कमाईचा हा आकडा 176.14 कोटी इतका झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर भारतातसुद्धा चित्रपट लवकरच 200 कोटींची कमाई करेल, असे तरण यांनी म्हटले आहे.

चौथ्या आठवड्यात चित्रपटाने जवळजवळ 13 कोटींचे कलेक्शन जमवले. चित्रपटाने चौथ्या आठवड्याच्या शुक्रवारी 1.56 कोटी, शनिवारी 3.01 कोटी, रविवारी 3.45 कोटी, सोमवारी 1.30 कोटी, मंगळवारी 1.29 कोटी, बुधवारी 1.26 कोटी, गुरुवारी 1.12 कोटी एवढा व्यवसाय केला आहे.

हा चित्रपट 200 कोटींचा टप्पाही पार करेल
हा चित्रपट लवकरच भारतात 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. 'द कश्मीर फाइल्स' आणि 'सूर्यवंशी' नंतर 'भूल भुलैया-2' हा कोरोनाच्या काळात 175 कोटींचा आकडा पार करणारा तिसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

'भूल भुलैया 2' पूर्वी 2018 मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिकचा 'सोनू के टीटू की स्वीटी' हा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, ज्याने 150 कोटींहून अधिक कमाई केली. अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक व्यतिरिक्त कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...