आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'ज्युरासिक पार्क'चा 6 वा फ्रँचायझी चित्रपट 'ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन' 10 जून रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाने केवळ 2 दिवसांत 194 मिलियन डॉलर म्हणजेच 1500 कोटींचे जागतिक कलेक्शन केले होते. हा आकडा आता तीन दिवसांत 400 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे साडेतीन हजार कोटी झाला आहे. ओपनिंगबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी चित्रपटाने 59 मिलियन डॉलर (460 कोटी) कमावले. 'ज्युरासिक पार्क' आणि 'ज्युरासिक वर्ल्ड'चे आतापर्यंत 6 चित्रपट आले आहेत. 'ज्युरासिक वर्ल्ड' हा पहिला चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे 5 सिक्वेल भाग होते. 'ज्युरासिक पार्क'चा सिक्वेल 2015 पासून 'ज्युरासिक वर्ल्ड' नावाने बनवला जात आहे, ज्याचे आतापर्यंत तीन चित्रपट आले आहेत. मागील सर्व फ्रँचायझींचे कलेक्शन कसे होते ते जाणून घेऊया-
ज्युरासिक पार्क
1993 मध्ये रिलीज झालेला 'ज्युरासिक पार्क' डायनासोर थीम पार्कच्या निर्मितीची अतिशय मनोरंजक कथा सांगते. रिलीज झाल्यानंतर, तोपर्यंतचा तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम दोन वर्षे राखून ठेवल्यानंतर त्याचा विक्रम 'बॅटमॅन फॉरएव्हर'ने मोडला. 2013 मध्ये हा चित्रपट पुन्हा 3D मध्ये प्रदर्शित झाला होता.
द लॉस्ट वर्ल्ड : ज्युरासिक पार्क
'ज्युरासिक पार्क'चा दुसरा भाग 'द लॉस्ट वर्ल्ड : ज्युरासिक पार्क' 1997 मध्ये रिलीज झाला होता. त्यावर्षीचा हा जगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट VFX साठी ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते, पण 'टायटॅनिक'मुळे हा चित्रपट ऑस्करमध्ये मागे पडला. पहिल्या आठवड्यातच 70 मिलियन डॉलर (570 कोटी रुपये) कमावणारा हा जगातील पहिला चित्रपट होता.
ज्युरासिक पार्क 3
'ज्युरासिक पार्क'चा तिसरा भाग 'ज्युरासिक पार्क 3' 2001 मध्ये रिलीज झाला होता. मागील दोन चित्रपटांच्या तुलनेत हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट होता, तरीदेखील त्याला हिट चित्रपटाचा दर्जा मिळाला आहे. या चित्रपटात, ट्रायनासोर्सला स्पाइनोसोर्सने रिस्पेस केले होते. जे नंतरच्या भागातही दिसले होते.
ज्युरासिक वर्ल्ड
1993 मध्ये सुरू झालेल्या फ्रँचायझीचे नाव 'ज्युरासिक पार्क'वरुन 'ज्युरासिक वर्ल्ड' असे करण्यात आले. कोस्टा रिकामध्ये डायनासोर्सचा थीम पार्क तयार करण्यात आल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जेव्हा ट्रान्सजेनिक डायनासोर त्याच्या पिंजऱ्यातून गायब होतो आणि कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे उद्यानातील रहिवाशांपर्यंत पोहोचतो तेव्हा ख-या अडचणी सुरु होतात. चित्रपटाने जवळपास 12 हजार कोटींची कमाई केली होती, जी गेल्या तीन भागांमध्ये सर्वाधिक होती.
ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम
2018 साली प्रदर्शित झालेला 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा फ्रँचायझी आहे. हा चित्रपट तब्बल 187 मिलियन डॉलर (1460 कोटी) च्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा 12वा चित्रपट आहे. हा चित्रपट 48 देशांमध्ये प्रदर्शित झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.