आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकांना आवडला नाही 'पठाण'चा टिझर:बॉयकॉट करण्याची होतेय मागणी, नेटकरी म्हणाले - हा चित्रपट वॉर आणि मार्व्हल्सची कॉपी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याचा आगामी चित्रपट 'पठाण'चा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख बऱ्याच काळानंतर मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. यामुळेच शाहरुखचे चाहते पठाणबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. मात्र यादरम्यान अनेक जणांना चित्रपटाचा टिझर आवडला नाही. लालसिंग चड्ढा, रक्षाबंधन आणि ब्रह्मास्त्राप्रमाणे पठाणवरही बहिष्कार टाकण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

टिझर रिलीज झाल्यापासून बॉयकॉट बॉलिवूड ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी पठाणच्या टिझरला वॉर आणि मार्व्हल्सची कॉपी असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुख हा चित्रपट बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये अडकताना दिसतोय.

बॉलिवूडमध्ये बॉयकॉटचा ट्रेंड पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे

शाहरुखच्या चित्रपटाचा टिझर रिलीज होताच बॉयकॉट ट्रेंड पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या टिझरबाबत चाहत्यांमध्ये एकीकडे एक्साइटमेंट असताना दुसरीकडे टिझरमधील उणिवा अधोरेखित करत नेटकरी सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. बॉयकॉट ट्रेंडमध्ये चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टिझरला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे

शाहरुखच्या टिझरला ट्रोल करत एका यूजरने लिहिले - 'हा चित्रपट मार्व्हल आणि वॉरची फक्त कॉपी पेस्ट आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले- 'आमचे स्वतःचे सण आहेत, आमची स्वतःची संस्कृती आहे. आम्ही आमचे पारंपारिक सण यापुढे साजरे करू, येथे पठाणांना स्थान नाही.' आणखी एका यूजरने लिहिले- 'पठाणचा टिझर हृतिकच्या 'वॉर' चित्रपटाची कॉपी आहे. क्रिंज टिझरचा प्रचार करणे थांबवा कारण त्यात शाहरुख आहे.' टिझर खराब असल्याचे सांगताना एका यूजरने लिहिले - 'हा चित्रपट टायगर जिंदा हैच्या दुसऱ्या भागासारखा दिसत आहे, चित्रपटात काही विशेष दिसत नाही,' अशा विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे

शाहरुख खान व्यतिरिक्त 'पठाण'मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे, हा यशराज फिल्म्स बॅनरचा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यशराज फिल्म्सने यापूर्वी एक था टायगर, टायगर जिंदा है आणि वॉर सारखे स्पाय थ्रिलर चित्रपट बनवले आहेत. आता या यादीत पठाणचेही नाव जोडले जाणार आहे. पठाण 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...