आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड अभिनेत्याची निवृत्ती:ब्रॅड पिटने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला – इंडस्ट्रीत ही माझी शेवटची वेळ आहे

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रॅडची इंडस्ट्रीत निवृत्तीची वेळ आली जवळ

जगातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या ब्रॅड पिटने नुकताच एक खुलासा केला आहे. या अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की, तो लवकरच चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. मात्र, तो कधी निवृत्त होणार हे त्याने स्पष्ट केलेले नाही, मात्र इंडस्ट्रीत आपली ही शेवटची वेळ असल्याचे तो म्हणाला आहे. लॉकडाऊननंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत, असे त्याने सांगितले.

ब्रॅडची इंडस्ट्रीत निवृत्तीची वेळ
ब्रॅड पिट म्हणाला, "इंडस्ट्रीमध्ये माझी आता निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. मला माहित नाही की त्यानंतर मी त्या वेळेचा कसा उपयोग करेन. मी अशा लोकांपैकी एक आहे जे त्यांच्या कलेसाठी ओळखले जातात. मला सुरुवातीपासूनच अभिनयात यायचे होते, जर मी तसे केले नसते तर मी मेलोच असतो," असा खुलासा त्याने केला. ब्रॅडने अलीकडेच 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड'मधील सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार आपल्या नावी केला.

ब्रॅड स्वतःवर खुश असतो
गेल्या दोन वर्षांपासून लो ग्रेड डिप्रेशनचा सामना केल्यानंतर ब्रॅडने स्वत:बद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, "मला वाटते की आनंद हा माझ्यासाठी एक नवीन शोध आहे. सुरुवातीला मी नेहमी प्रवाहासोबत वाहात राहिलो आणि नंतर मला समजले की मी माझ्या आयुष्यातील किती वर्षे लो-ग्रेड डिप्रेशनमध्ये घालवली. मी स्वतःला मिठी मारणेपर्यंत हे घडत राहिले. स्वतःची चांगली आणि वाईट बाजू मी ओळखली. आता मी आनंदाचे क्षण जगत आहे."

5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे ब्रॅडचा 'बुलेट ट्रेन' हा चित्रपट
ब्रॅडच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेता सध्या त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अँजेलिना जोलीसोबतच्या कायदेशीर वादामुळे चर्चेत आहे. ब्रॅडने अँजेलिनावर वाईन व्यवसायातील शेअर्स विकल्याबद्दल खटला दाखल केला आहे. तर वर्कफ्रंटवर ब्रॅड पिटचा आगामी चित्रपट 'बुलेट ट्रेन' 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...