आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'ला मिळू शकते वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग:अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी एक लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी ग्रॅण्ड ओपनिंगसाठी सज्ज आहे. 2 सप्टेंबरपासून या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग करू शकतो ही निर्मात्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे. खरं तर, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शोच्या 3 नॅशनल चेनमध्ये आतापर्यंत 1.5 लाखांपेक्षा जास्त तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे.

वीकेंडमध्ये आधीच 2 लाख तिकिटे विकली गेली आहेत
पहिल्या दिवसासोबतच 'ब्रह्मास्त्र'च्या वीकेंडच्या तिकीटांचीही विक्री जोरात सुरू आहे. वीकेंडसाठी आतापर्यंत चित्रपटाची 2 लाख तिकिटे आगाऊ विकली गेली आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या काळापासून बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. याआधी, सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट 83 होता, ज्याची पहिल्या दिवशी 1.17 लाख तिकिटे विकली गेली होती. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्र हा विक्रम अगदी सहज मोडेल.

भूल भुलैयाने ग्रॉस कलेक्शनचा विक्रम मोडला
बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 2022 वर्षातील सर्वात मोठ्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग ग्रॉस कलेक्शनचा विक्रम भुल भूलैय्याच्या नावावर होता, परंतु ब्रह्मास्त्रने हा विक्रम मोडला आहे. रणबीरचा चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. कार्तिकच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला होता, तर ब्रह्मास्त्रचे ओपनिंग डे कलेक्शन जवळपास 25 ते 30 कोटी असेल अशी अपेक्षा आहे.

वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग आहे KGF Chapter 2
KGF Chapter 2 हा 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली होती, ज्याचा विक्रम मोडणे कठीण आहे. पण अ‍ॅडव्हान्स बुकिंग लक्षात घेता ब्रह्मास्त्र, आरआरआरच्या ओपनिंग डेचा विक्रमही मोडू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या आधी या चित्रपटांना मिळाली होती मोठी ओपनिंग
कोरोनाच्या आधी अनेक चित्रपटांना दमदार ओपनिंग मिळाली होती. यामध्ये मिशन मंगल, टायगर जिंदा है, संजू, दंगल आणि सुलतान यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्रची ओपनिंग रणबीरच्या 'संजू' चित्रपटापेक्षा चांगली होऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...