आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची वर्षातील शेवटचा मोठी खेळी 'ब्रह्मास्त्र':पहिल्या दिवशी 1.25 लाख तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग, 150 कोटींचे VFX

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होणार आहे. #BoycottBollywood च्या ट्रेंडच्या वातावरणात हा या वर्षातील बॉलिवूडची सर्वात मोठा डाव असल्याचे म्हटले जात आहे. सुमारे 410 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात 150 कोटी रुपये फक्त VFX वर खर्च करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रावरही बॉयकॉटचे सावट आहे. मात्र असे असतानाही पहिल्या दिवशी 1.25 लाखांहून अधिक तिकिटे अ‍ॅडव्हान्स बुक झाली आहेत आणि वीकेंडसाठी सुमारे अडीच लाख तिकिटे बुक झाली आहेत. असे असूनही चित्रपट चांगला व्यवसाय करू शकला नाही तर बॉलिवूडवर #Boycott चे संकट अधिक गडद होईल.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, चित्रपटात किती मोठी रक्कम गुंतवण्यात आली आहे, त्याच्या कमाईचा अंदाज, बॉयकॉटचे कारण आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती तज्ज्ञांच्या कमेंटसह जाणून घेऊया -

ब्रह्मास्त्रचे बजेट 410 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये स्टारकास्टची फी, मार्केटिंग कॉस्ट, प्रमोशन कॉस्ट, मेकिंग आणि व्हीएफएक्स खर्चाचा समावेश आहे. हा सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट आहे, तर RRR, 2.0 नंतर भारतात बनलेला तिसरा सर्वात महागडा चित्रपट आहे.

बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटाचा विक्रम आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या नावावर होता, जो ब्रह्मास्त्रने मोडित काढला आहे.

बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम प्रमोशनवर दिसला
11 वर्षांपूर्वी रणबीर कपूरने स्वतःला बिग बीफ बॉय म्हटले होते. म्हणजे गोमांस खाणारा. त्याच वेळी, नेपो किड म्हणून आधीच चर्चेत असलेल्या आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उद्दामपणे म्हटले होते की, जर लोकांना ती आवडत नसेल तर तिचे चित्रपट पाहू नका. दोन्ही लीड स्टार्सच्या वक्तव्यामुळे ब्रह्मास्त्रासाठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. 6 सप्टेंबरला आलिया, रणबीर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले होते, पण त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही. रणबीरने 11 वर्षांपूर्वी दिलेले वक्तव्य त्यासाठी कारणीभूत ठरले.

VFX वर खर्च करण्यात आले 150 कोटी रुपये
हा फँटसी अ‍ॅडव्हेंचर चित्रपट खरा दिसावा यासाठी निर्मात्यांनी हाय लेव्हल व्हीएफएक्सचा वापर केला आहे, ज्यावर निर्मात्यांनी 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. या चित्रपटाचे व्हीएफएक्स डीएनईजी (डबल निगेटिव्ह स्टुडिओ) ने केले आहे. हा एक ब्रिटिश भारतीय स्टुडिओ आहे ज्याचे मुख्यालय लंडनमध्ये आहे, तर मुंबई, लॉस एंजिलिस, चेन्नई, मॉन्ट्रियल, चंदीगड, बंगळुरु, टोरंटो, व्हँकुव्हर येथेदेखील त्याचे स्टुडिओ आहेत.

स्टुडिओने आतापर्यंत इंसेप्शन, इंटरस्टेलर, एक्स मशीन, ब्लेड रनर 2049, फर्स्ट मॅन, टेनेट आणि ड्यून यांसारख्या चित्रपटांसाठी 7 ऑस्कर जिंकले आहेत. या स्टुडिओने हॅरी पॉटर अँड द डेथली हॉलो, अ‍ॅव्हेंजर: इन्फिनिटी वॉर, अ‍ॅव्हेंजर एंडगेम, गॉडझिला व्हर्सेस काँग, मुलान, अलादीन, मिशन इम्पॉसिबल: फॉल आउट यांसारख्या 100 हून अधिक चित्रपटांसाठी VFX चे काम केले आहे.

चित्रपटाच्या टायटल लोगोमध्ये वापरण्यात आले होते 150 ड्रोन
चित्रपटाचा टायटल लोगो 4 मार्च 2019 रोजी, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदर्शित झाला. याच दिवशी अलाहाबादच्या अर्ध कुंभमेळ्यात टीमने 150 ड्रोनच्या मदतीने लाइट शोमध्ये लोगो उघड केला होता. तुम्ही खालील फोटोमध्ये तो लोगो पाहू शकता.

पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई होण्याचा अंदाज आहे

ट्रेड एक्सपर्ट्स आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंगनुसार, चित्रपट पहिल्याच दिवशी 30-35 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन करू शकतो. यापूर्वी, सलमान खानच्या दबंग 3 ने नॉन हॉलिडे रिलीजमध्ये 20 कोटींची ओपनिंग केली होती.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी 1.25 लाख तिकिटांची विक्री झाली

ब्रह्मास्त्र चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग 2 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिससह देशभरात ओपनिंग डेसाठी आतापर्यंत 1.25 लाख तिकिटे बुक करण्यात आली आहेत. यासह वीकेंडसाठी सुमारे अडीच लाख तिकिटे अ‍ॅडव्हानस बुक करण्यात आली आहेत. ब्रह्मास्त्रला कोरोना कालावधीनंतरची सर्वात मोठी ओपनिंग मिळणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ब्रह्मास्त्रने एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटालाही मागे टाकले आहे.

ब्रह्मास्त्रद्वारे बॉलिवूडचे नुकसान भरुन निघून शकेल का?

उत्तर- बॉलिवूडचे नुकसान तेव्हाच भरुन निघेल, जेव्हा प्रेक्षकांना त्यातील कंटेंट आवडेल. कथा चांगली असेल तर रिकव्हर होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहिती आहेच की, गेले काही आठवडे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूप वाईट गेले आहे. मोठे सिनेमे, मग तो लाल सिंग चड्ढा, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, जर्सी किंवा शमशेरा असो, बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. आगामी काळात प्रदर्शित होणारा ब्रह्मास्त्र आणि त्यानंतर प्रदर्शित होणारा विक्रम वेधा चित्रपटसृष्टीला पुन्हा रुळावर आणेल अशी आम्हाला आशा आहे.

ब्रह्मास्त्र RRR चा रेकॉर्ड मोडेल का?

उत्तर- हे सांगणे खूप घाईचे आहे, कारण अ‍ॅडव्हान्स बुकिंग आता सुरू झाले आहे. पण अ‍ॅडव्हान्स बुकिंग खूप चांगले झाले आहे असे ते नक्कीच म्हणू शकतात. आत्तापर्यंत चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने वेग घेतला आहे आणि येत्या काही दिवसांत तो आणखी चांगला होईल.

ब्रह्मास्त्र फ्लॉप झाला तर काय होईल? बॉलिवूड किती मागे जाईल?

उत्तर- सध्या फिल्म इंडस्ट्री आयसीयूमध्ये आहे. जर ब्रह्मास्त्रही फ्लॉप झाला तर मी काय उत्तर देऊ? इंडस्ट्री अंधारात आहे. आशेचा एक किरण येईल, ज्याला ब्रह्मास्त्र नाव दिले आहे. इंडस्ट्रीला ऑक्सिजनची गरज आहे. 2022 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी चांगले राहिले नाही. यापूर्वीही चित्रपट फ्लॉप झाले होते, मात्र यावर्षी चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले. चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. बडे स्टार्स बघायला प्रेक्षक थिएटरमध्ये आले नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. ब्रह्मास्त्रला पुन्हा लांबलचक रांगा, हाऊसफुल्ल बोर्ड पाहायला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे.

ब्रह्मास्त्र फ्लॉप झाला तर पुढचा आशेचा किरण कोणता असेल?

उत्तर- हा चित्रपटही फ्लॉप झाला, तर पुढची आशा विक्रम वेधाकडून असेल.

जगभरात हा चित्रपट 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे

ब्रह्मास्त्र चित्रपट भारतात 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे वितरण हक्क स्टार स्टुडिओकडे आहेत. 21 फॉक्स स्टार स्टुडिओच्या शीर्षकातून फॉक्स काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या स्टुडिओच्या नव्या नावाने प्रदर्शित होणारा ब्रह्मास्त्र हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे जगभरात वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर फिल्म्सद्वारे वितरण केले जाईल. भारतातील 4500 स्क्रीनसह जागतिक स्तरावर 8000 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

चित्रपटाशी संबंधित काही रंजक तथ्ये-

  • चित्रपटाचे शीर्षक आधी ड्रॅगन होते, मात्र निर्मात्यांनी नंतर ते बदलून ब्रह्मास्त्र केले.
  • अयान मुखर्जीने 6 वर्षांत चित्रपटाची कथा तयार केली आहे.
  • ब्रह्मास्त्र तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून याला 10 वर्षे लागतील. पहिला भाग ब्रह्मास्त्र: शिवा 2022 मध्ये रिलीज होत आहे आणि उर्वरित दोन भाग पुढील 10 वर्षांत येतील.
  • चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक 13व्या शतकातील उर्दू लेखक रुमीकडून प्रेरित होता, ज्यासाठी त्याने आपले केसही वाढवले ​​होते, मात्र नंतर त्याने शूटिंग सुरू होण्यापूर्वी ही आयडिया ड्रॉप केली. याचे एक कारण म्हणजे शमशेरामध्ये रणबीर लांब केसांमध्ये दिसला आहे.
  • हा चित्रपट हिंदी, तामिळ तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
  • एसएस राजामौली हा चित्रपट दक्षिणेतील 4 भाषांमध्ये सादर करत आहेत.
  • हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु पुढे ढकलत ढकलत हा चित्रपट आता 6 वर्षांनी प्रदर्शित होत आहे.
  • ब्रह्मास्त्रच्या पुढील भागात नवीन पात्रांची ओळख करून दिली जाईल.
  • या चित्रपटाच्या आगामी भागांमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्सही दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण देखील पुढच्या चित्रपटात सुपरपॉवरसोबत दिसणार आहे, तर काजोल आणि माधुरीदेखील पुढील चित्रपटाचा भाग असू शकतात.
बातम्या आणखी आहेत...