आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र' असेल बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट:निर्मात्यांनी लावले 410 कोटी रुपये पणाला, 9 सप्टेंबरला 8000 स्क्रीन्सवर होणार रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, रिलीजपूर्वीच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे. खरं तर, ब्रह्मास्त्र हा चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीसाठी खूप खास आहे, त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटावर खूप पैसा आणि वेळ खर्ची घातला आहे. जर ब्रह्मास्त्रही बॉयकॉट ट्रेंडला बळी पडला तर चित्रपटाला मोठे नुकसान सहन करावे लागेल.

410 कोटींमध्ये बनला ब्रह्मास्त्र
रिलीजच्या काही दिवस आधी वृत्त आहे की, की ब्रह्मास्त्र बनवण्यासाठी 410 कोटींपेक्षा जास्त बजेट खर्च केले गेले आहे. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. RRR, साहो, बाहुबली, 2.0 व्यतिरिक्त, आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बजेट चित्रपट 2018 मध्ये आलेला ठग्स ऑफ हिंदोस्तान होता, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता ब्रह्मास्त्र सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या बजेटमध्ये प्रमोशन आणि थिएटरचा खर्च समाविष्ट नाही. ब्रह्मास्त्रचे VFX हा चित्रपटाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. निर्मात्यांनी व्हीएफएक्स इफेक्ट्स उत्कृष्ट करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. याशिवाय लोकेशन आणि स्टार फीसह अनेक गोष्टींवर पैसे खर्च करण्यात आले आहेत.

8000 स्क्रीनवर रिलीज होईल
ब्रह्मास्त्र हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याने निर्मात्यांनी तो मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रह्मास्त्र जगभरात 8000 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. ज्यामध्ये 5000 भारतीय स्क्रीन आणि 3000 स्क्रीन्स परदेशात असतील. मात्र, ब्रह्मास्त्र बनवण्यापासून ते प्री-लाँच आणि स्क्रीन खरेदी करण्यापर्यंत निर्मात्यांनी खूप पैसा खर्च केला आहे.

निर्माते चित्रपटाविषयी नर्व्हस
चित्रपट पूर्ण व्हायला जवळपास एक दशकाचा काळ लागला. दिग्दर्शक अयान मुखर्जीसाठी हा चित्रपट खूप खास आहे, म्हणून त्याने या चित्रपटासाठी बराच वेळ दिला. मात्र, कोविडमुळे चित्रपट उशिरा पूर्ण झाला. अखेर बऱ्याच कालावधीनंतर हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. प्रत्येकाने चित्रपटाला वेळ दिला आहे, त्यामुळे अयान मुखर्जी, करण जोहर, आलिया-रणबीरसह चित्रपटातील सर्व कलाकार खूप नर्व्हस आहेत. मात्र, हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल आणि लोकांना तो आवडेल असाही निर्मात्यांना विश्वास आहे.

75 रुपयांमध्ये पाहता येईल ब्रह्मास्त्र
16 सप्टेंबरला राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त सिनेमाच्या तिकिटाची किंमत फक्त 75 रुपये असेल. ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत असल्याने, चाहत्यांना 16 सप्टेंबरला अवघ्या 75 रुपयांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...