आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'चे दुसरे गाणे 'देवा देवा'चा प्रीव्ह्यू इव्हेंट:पती रणबीरसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली आलिया, पहिल्यांदाच दिसला अभिनेत्रीचा बेबी बंप

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटो आणि व्हिडिओमध्ये आलिया भट्टचा बेबी बंप पहिल्यांदाच स्पष्टपणे दिसत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता अलीकडेच आलिया-रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत मुंबईत चित्रपटाच्या गाण्याच्या प्रिव्ह्यू इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये आलिया भट्टचा बेबी बंप पहिल्यांदाच स्पष्टपणे दिसत आहे.

आलिया-रणबीर शनिवारी (6 ऑगस्ट) 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील दुसरे गाणे 'देवा देवा'च्या प्रीव्ह्यू इव्हेंटमध्ये पोहोचले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये, आलिया कार्यक्रमादरम्यान पापाराझींसमोर पती रणबीर आणि अयानसोबत पोज देताना दिसतेय. आलियाने ब्राउन कलरचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप पहिल्यांदाच स्पष्ट दिसत आहे. तर रणबीरने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी जीन्स घातली आहे. बऱ्याच दिवसांनंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत.

या कार्यक्रमापूर्वी आलिया भट्टनेही याच ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. काही फोटो शेअर करत आलियाने लिहिले, "प्रेस आणि माझी छोट्याशा जीवासोबत 'देवा देवा' गाणे पाहण्यासाठी तयार आहे. 'देवा देवा' गाणे 8 ऑगस्टला रिलीज होत आहे." आलियाने 2 दिवसांपूर्वी 'देवा देवा'चा टीझरही चाहत्यांसोबत शेअर केला होता.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि 'केसरिया' हे पहिले गाणे यापूर्वीच रिलीज झाले आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया-रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रणबीर-आलिया लवकरच आई-बाबा होणार आहेत. आलियाने पाच आठवड्यांपूर्वी म्हणजेच जूनमध्ये पोस्ट शेअर करून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. 14 एप्रिल रोजी या दोघांचे लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...