आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या एका मिनिटात फिल्म रिव्ह्यू:शाहरुख सरप्राईज पॅकेज, क्लायमॅक्स विसरता येणार नाही, रणबीरचा अभिनय दमदार

इफत कुरेशी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत, तर शाहरुख खान आणि नागार्जुन यांनी चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट उत्तम VFX आणि अनेक सस्पेन्सने परिपूर्ण आहे. 'ब्रह्मास्त्र'चा पहिला भाग शिवावर आधारित आहे जो एक सामान्य मुलगा आहे, परंतु त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. शिवाला त्याचे शस्त्र आणि ब्रह्मास्त्रबद्दल माहिती मिळते, तसतशी चित्रपटाची कथा पुढे सरकते. शिव इतर शस्त्रांच्या मालकांना मदत करतो आणि ब्रह्मास्त्रच्या तुकड्यांचे रक्षण करतो. सेकंड हाफमध्ये गुरुजी म्हणजेच अमिताभ बच्चन शिवाला त्यांच्या आई-वडिलांशी संबंधित एक रहस्य सांगतात. ब्रह्मास्त्र कसे वाचवले जाईल आणि ते वाचवण्यासाठी किती लोकांना बलिदान द्यावे लागेल, या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातून मिळतील. पुढील कथा ब्रह्मदेवाची म्हणजेच देवाची आहे. हे सरप्राइज निर्मात्यांनी पार्ट 2 साठी राखून ठेवले आहे.

अवघ्या एका मिनिटात चित्रपटाचा संपूर्ण आढावा जाणून घेण्यासाठी वरील छायाचित्रावर क्लिक करा आणि व्हिडिओ बघा -

बातम्या आणखी आहेत...