आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'ने दुसऱ्या शुक्रवारी केली 10.30 कोटींची कमाई:शनिवारी कलेक्शन वाढण्याचा अंदाज, दुसऱ्या वीकेंडला गाठू शकतो 200 कोटींचा टप्पा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 10.30 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम असून शनिवारी अॅडव्हान्स बुकिंगद्वारे सुमारे 5 कोटींचा व्यवसाय झाला आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट देशात 200 कोटींचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पहिल्या आठवड्यात ब्रह्मास्त्रचे जागतिक कलेक्शन 300 कोटी झाले आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये संपूर्ण आठवडाभर क्रेझ होती आणि फाइव्ह डेज वीकमध्येही त्याचे कलेक्शन 10 कोटींच्या आसपास राहिले. हे पाहता हा चित्रपट शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी चांगला व्यवसाय करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशात 183 कोटी आणि जागतिक स्तरावर 300 कोटींचा व्यवसाय
'ब्रह्मास्त्र'ने हिंदीसह सर्व भाषांमध्ये 183.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. दाक्षिणात्य भागांमध्येही या चित्रपटाने बॉलिवूडच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने सात दिवसांत 300 कोटींची जागतिक कमाई केली आहे.

15 ते 20% वाढेल ऑक्युपेंसी
शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या थिएटरची ऑक्युपेंसी 15 ते 20 टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, चित्रपटात कौटुंबिक प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजन आहे. त्यामुळे चित्रपटाची हाईप कायम आहे. समोर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाहीये, हाही मोठा फायदा आहे.

सध्या मोठा चित्रपट नाही
ब्रह्मास्त्रची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या आठवड्यात एकही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. फक्त स्वरा भास्कर स्टारर 'जहाँ चार यार' हा चित्रपटगृहात आला आहे, पण त्याचे रिव्ह्यू निगेटिव्ह आहेत, आणि चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासारखा नाही, असे म्हटले जात आहे. 'ब्रह्मास्त्र'ला याचा फायदा मिळू शकतो. थ्रीडी आणि हेवी व्हीएफएक्समुळे या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. असे स्पेशल इफेक्ट असलेला हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...