आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन:'ब्रँड कंगना'ला लागली उतरती कळा, हातातून निसटले अनेक एंडोर्समेंट, ठरले ग्लॅमर वर्ल्डमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या दोन वर्षात कंगनाने ज्या प्रकारे स्वतःभोवती वाद ओढवून घेतले आहेत, ती आता एक केस स्टडी ठरु शकते.

गेल्या दोन वर्षांत कंगना रनोट हिने जेवढी प्रसिद्धी एकवटली आहे, ती तिच्या कामापेक्षा अधिक वादाशी संबंधित आहे. एनआरसी-सीसीएनंतर शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर बंगाल निवडणुका, कंगनान बिनधास्तपणे आपले मत व्यक्त केले. मात्र, यामुळे यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी क्वीला बराच मनःस्तापदेखील सहन करावा लागला आहे. एकेकाळी कंगनाकडे अनेक ब्रॅण्ड्सचे एंडोर्समेंट्स होते, मात्र आता तिच्या हातात काहीच उरले नाही. एक प्रकारे ब्रॅण्ड कंगनाच्या लोकप्रियतेला ग्लॅमरच्या दुनियेत उतरती कळा लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.

4 राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म पुरस्कार आपल्या नावी करणा-या कंगनाने आपल्या कामामुळे प्रत्येकाला आश्चर्यचकित केले आहे, परंतु मार्केट तज्ज्ञांच्या मते, तिचे ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याचे कारणही ती स्वतःच आहे. प्रत्येक मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करणे आणि इंडस्ट्रीतील लोकांशी थेट थेट पंगा घेणे, ही त्यामागचे कारणे आहेत. यामुळे, बहुतेक ब्रँड्सनी तिच्यासोबतचे करार मोडले आहेत.

रफ अँड टफ आणि सौंदर्य-फॅशन आयकॉन
कंगनाने ज्या प्रकारची पात्रे मोठ्या पडद्यावर साकारली आहेत, तीच विविधता तिच्या ब्रँड एंडोर्समेंटमध्येही झळकली आहे. रिबोक शूटच्या जाहिरातीत ती रफ अँड टफ इमेजमध्ये दिसली. तर नक्षत्र ज्वेलरीच्या जाहिरातीत तिच्या सौंदर्याने सगळ्यांना भूरळ घातली. आस्क मी ग्रोसरीच्या जाहिरातीत कंगना गर्ल नेक्स डोर इमेजमध्ये दिसली. तर टायटन I+ मध्ये ती आपली फॅशन चॉइस दाखवताना दिसली. लिव्हॉन सिरप आणि बजाज आलमंड ड्रॉप तेलची जाहिरात असो किंवा स्वच्छ भारत अभियान प्रत्येक जाहिरातीत कंगनाने आपली वेगळी छाप सोडली आहे. या व्यतिरिक्त कंगना वॉयला ज्वेलरी, वेरो मोडा फॅशन ब्रँड, लो मेन पीजी थ्री, मिंत्रा आणि हिमाचल प्रदेश टूरिझमसाठी एंडोर्समेंट करत होती.

स्वतः कंगनाने कबूल केले की, तिच्या हातून ब्रँड्स निसटत चालले आहेत
स्वत: कंगनाने मुलाखतीत सांगितले होते की. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात मत व्यक्त केल्यानंतर तिला 15 कोटी रुपयांचे ब्रँड एंडोर्समेंट्स गमवावे लागले होते. तेव्हापासून सुरु झालेला हा क्रम आजतागायत सुरु असून आता तिच्या हातात केवळ लिवा फॅब्रिक आणि मुंबईतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुप प्लॅटिनम या ब्रँड्सशिवाय इतर कोणताही मोठा ब्रँड नाहीये. लिवा फॅब्रिक हा बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीचा ब्रँड आहे. भास्करने ग्रासिम इंडस्ट्रीला लिवा आणि कंगना यांच्यातील असोसिएशनविषयी प्रश्न विचारले, पण उत्तर मिळाले नाही. ईमामीच्या युट्यूब चॅनलवर कंगनाची जाहिरात दिसतेय, पंरतु ती खूप खाली दिसत आहे. या ग्रुपच्या दुसर्‍या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये सलमान खान, आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन आणि जूही चावला दिसत आहेत, पण कंगनाची जाहिरात हायलाइट होत नाहीये. इमामी ग्रुपनेही 'भास्कर'च्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

कंगना ब्रँड व्हॅल्यूनुसार टॉप ट्वेंटीमध्ये नाही
आंतरराष्ट्रीय कंपनी डफ अँड फैल्प्सने तीन महिन्यांपूर्वी ब्रँड व्हॅल्यूनुसार भारताच्या टॉप 20 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. यामध्ये दीपिका पाच कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या क्रमांकावर होती. आलिया सहाव्या, अनुष्का 13 व्या आणि 1.59 कोटी डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह प्रियांका 19 व्या स्थानावर होती. या यादीमध्ये कंगनाचा समावेश नव्हता. धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना -2' मधून बाहेर पडल्यानंतर कार्तिक आर्यनला अलीकडेच कंगनाने पाठिंबा दर्शविला होता. कार्तिक 1.5 कोटी डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह या यादीत 20 व्या स्थानावर आहे.

एंडोर्समेंटवरुन नवा वादंग
कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर ड्रेस डिझाइनर आनंद भूषण आणि रिमझिम दादू यांनी कंगनासोबतचे आपले व्यावसायिक नाते संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली होती. शिवाय कंगनासोबतची सर्व छायाचित्रे त्यांच्या सोशल मीडियावरून काढून टाकणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने तातडीने स्पष्टीकरण दिले की, कंगनाचे त्यांच्याशी कधीच व्यावसायिक संबंध नव्हते. या डिझाइनर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील रंगोलीने दिला होता.

एन्डोर्समेंटमधून होणारी कंगनाची कमाई
एखाद्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी किती पैसे घेतले, हे कोणतेही सेलिब्रिटी कधीही उघडपणे सांगत नाहीत. परंतु, इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, जाहिरात कोणती आहे आणि ती कोणत्या माध्यमावर किती काळ चालू शकते यावर कलाकाराचे मानधन निश्चित केले जाते. कंगनाच्या बाबतीत ही सुरुवात 25 लाखांपासून होते आणि प्रचार हा केवळ एका इव्हेंटसाठी आहे की, टीव्ही कमर्शियलसाठी आहे की, एखाद्या शोसाठी आहे, यावर हे मानधन कोटींच्या घरात जाते. वृत्तानुसार, कंगना एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी रुपये घेते, सध्या ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

सोशल मीडिया अकाऊंट बंद झाले म्हणजेच उत्पन्नाचा एक स्त्रोतही गेला आहे
सर्व स्टार्ससाठी सोशल मीडिया अकाउंट्स केवळ त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्याचे किंवा त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचे माध्यम नाही तर उत्पन्नाचे एक स्त्रोत देखील आहे. स्टार्सच्या ब्रँड एंडोर्समेंटमध्ये सोशल मीडियावरील एक पोस्टचादेखील समावेश असतो. प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटींना एका ब्रँडसाठी पोस्ट करण्यासाठी लाखो रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे, याचा अर्थ असा आहे की सोशल मीडियाद्वारे तिच्या उत्पन्नाचे एक स्त्रोत बंद केले गेले आहे. ट्विटरवर कंगनाचे 3 मिलियन फॉलोअर्स होते. तर कंगनाला इंस्टाग्रामवर 80 लाख लोक फॉलो करतात. म्हणून सध्या तिच्याकडे सोशल मीडिया एंडोर्समेंटचा एक मार्ग खुला आहे.

कंगना बॉलिवूडमध्ये एकटी पडली का?
बॉलिवूडमधून अनुपम खेर, परेश रावल आणि मनोज जोशी यांच्यासारखे अनेक अभिनेते आणि इतर दुसरे सेलिब्रिटी भाजपाच्या मुद्द्यांनुसार पोस्ट करत असतात, परंतु कंगनाचे ट्विटर अकाउंट बंद झाल्यावर भाजपचे समर्थक मानले जाणारे सेलिब्रिटी तिच्या बाजुने उभे राहिले नाहीत. भाजपच्या काही लोकांनी ट्विटरवरून #RestoreKangana ट्रेंड सुरू केला पण त्यात बॉलिवूडमधून कोणीही जुळले नाही.

स्वतःची प्रॉडक्शन कंपनी
कंगनाचा 'थलायवी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याशिवाय तिचे 'धकड' आणि 'तेजस' हेदेखील आगामी प्रोजेक्ट आहेत. या चित्रपटांमध्ये कंगनाशिवाय बॉलिवूडचे इतर कोणतेही मोठे नाव नाही. कंगनाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे, त्यामुळे भविष्यात कदाचित कोणताही मोठा अभिनेता तिच्या प्रोजेक्टमध्ये सामील होणार नाही. कंगनाने अलीकडेच स्वत: ची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे. कदाचित येत्या काळात कंगना केवळ आपल्या होम प्रॉडक्शनमध्येच काम करेल, नाहीतर पूर्णवेळ राजकारणात सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रोखठोक मत मांडत असते कंगना मात्र सध्या बाळगले मौन
'भास्कर'ने ब्रँड व्हॅल्यूसंबंधित कंगनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कंगना स्वतः कोविड पॉझिटिव्ह आहे. यापूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा ती दुस-या कामात व्यस्त आहे, आता बोलू शकत नाही, असे तिच्या टीमच्या वतीने सांगण्यात आले. कंगनाने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली आहे, त्या ईमेल आयडीवर प्रश्न पाठवण्यात आले, मात्र त्याची उत्तरे आले नाहीत.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँडचे चीफ मेंटर डॉ. संदीप गोयल
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँडचे चीफ मेंटर डॉ. संदीप गोयल

कंगना स्वत: ब्रँड व्हॅल्यू संपवण्याचा प्रयत्नात आहे का?
कंगना नावाचा ब्रँड ज्या प्रकारे तयार झाला आणि आता त्याला ज्या प्रकारे उतरती कळा लागली आहे, हे ह्युमन ब्रँड अभ्यासाच्या केस स्टडीसारखे आहे. कंगना स्वतः तिचे ब्रँड व्हॅल्यू कशी कमी करत आहे याविषयी भास्करने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँडचे मुख्य मार्गदर्शक डॉ. संदीप गोयल यांच्याशी खास बातचीत केली :

प्रश्नः ट्विटर बंदीमुळे कंगनाच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम झाला आहे?
उत्तरः हा ट्विट मुद्दा खरं तर दीर्घकाळापासून चाललेल्या कहाणीचा केवळ एक भाग आहे. गेल्या वर्षभरापासून कंगनाची नकारात्मक, भांडखोर वृत्ती दिसून आली आहे. त्यामुळे कंगनाच्या अलीकडच्या ट्विटमध्ये काही नवीन किंवा आश्चर्यकारक काही नव्हते. कंगना हा ब्रँड धुळीस मिळताना दिसतोय. स्वतःच्या पायावर कु-हाड मारुन घेण्याचा हा तिचा आणखी एक प्रयत्न आहे.

प्रश्न: ब्रँड कॅम्पेन दीर्घकाळासाठी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवत असतात, त्यामुळे सेलिब्रिटीसुद्धा दीर्घकाळासाठी ब्रँड एंडोर्समेंटशी जुळले असतात. अशा घटना किंवा वाद ब्रँड इमेजवर परिणाम घडवू शकतात का?
उत्तरः जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे ही एक घटना नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, उद्धव ठाकरे सरकारसोबतचा वाद, बीएमसी बरोबरचा लढा या सगळ्यावरून असे दिसून येते की कंगना बर्‍याच काळापासून पंगा घेण्याच्या मूडमध्ये होती. अनेक ब्रँड कंगनाच्या अशा आक्रमकतेमुळे मागे हटले आहेत. आज, कोणताही ब्रँड कंगनाच्या या नकारात्मकतेचा आणि आक्रमक वागणुकीचा धोका घेऊ इच्छित नाही. कदाचित कंगना काही विषयांवर योग्य बोलली असेल, पण ती ज्या पद्धतीने आपले मत मांडते त्यात सभ्य वर्तन दिसत नाही. ब्रँडला दमदार व्यक्तिमत्त्वांची गरज असते, पण इतक्याही नाही.

प्रश्नः कंगनाचे वाद सोडले तर ती एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे, तिने अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत, तिच्या स्त्रीवादी भूमिकांचे खूप कौतुक झाले आहे, तिची एक विशिष्ट फॅन फॉलोइंग आहे आणि त्याचे अनेक अर्थ आहेत. त्यामुळे सर्वात प्रभावी काय आहे, हे एखादे ब्रँड एंडोर्मेंट निश्चित करत का? किंवा कोणताही वाद किंवा त्या सेलिब्रिटीचे संपूर्ण व्यक्तिमत्व?
उत्तरः कंगनाचा एकच वाद नाही. ती दर आठवड्याला एक नवीन वाद निर्माण करते, ज्यामध्ये एक प्रकारचा द्वेष असतो. अगदी वर्षभरापूर्वी कंगनाने तिची खूप मजबूत आणि भक्कम प्रतिमा तयार केली होती. ज्यामुळे ती बर्‍याच ब्रँडची आवडती कलाकार झाली होती, पण सध्या तिच्याबरोबर काम करणे खूप धोकादायक बनले आहे.

प्रश्नः प्रचाराच्या जगात असेही म्हटले जाते की नकारात्मक प्रसिद्धी देखील प्रचाराचा एक प्रकार आहे. हे ब्रँड एंडॉर्समेंटमध्ये देखील लागू होते का?

उत्तरः होय, हे घडू शकते परंतु त्यामध्ये तुम्हाला एका मर्यादेत राहावे लागेल. अक्षय कुमारचा भाजपच्या विचारसरणीकडे कल हा सर्वश्रुत आहे. पण, गटात राहूनदेखील अक्षय कधीही तर्कहीन किंवा नकारात्मक दिसला नाही. म्हणूनच तो शासनाच्या योजनांचा प्रचार करतो.

प्रश्नः कंगनाच्या बाबतीत असे प्रथमच घडले नाही. स्वत: कंगनाने कबूल केले आहे की शेतकरी आंदोलनादरम्यानच्या काही वक्तव्यांमुळे तिला ब-याच गोष्टी गमवाव्या लागल्या. हे माहित असूनदेखील, ती वादाला तोंड फोडते? ही आक्रमक वृत्ती स्वत:साठी राजकारणाचा पाया घालण्याची एक ब्रँड स्ट्रॅटेजी असू शकते का? उत्तरः कंगनाच्या राजकीय महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीत. पण, ती मोठ्या नकारात्मक वृत्तीने त्या मार्गावर जात आहे. अधिक मित्र बनवण्यापेक्षा ती अधिक शत्रू निर्माण करत आहे. ती स्वत: एक शक्तिशाली ब्रांड होती, परंतु तिने स्वतःच तिचा ब्रँड नष्ट केला. जेव्हा आपण वादग्रस्त व्यक्ती बनता, तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होऊ लागते आणि ती पुन्हा कधीच परत येत नाही.

बातम्या आणखी आहेत...