आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लुक आउट:लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या ब्रोमान्स आणि ब्रेकअपमागील अनेक रहस्ये उलगडतील, 'ब्रेक पॉइंट'चा फर्स्ट लुक रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ली-हेश’चे नाते आणि ब्रेक-अप बाबत चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना लवकरच मिळणार आहेत.

अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी लवकरच 'ब्रेक पॉइंट' ही 7 भागांची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांचे ऑफ-कोर्ट जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित अशा ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित ही मालिका असणार आहे. निर्मात्यांनी या झी5 ओरिजिनल सीरीजचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले असून ‘ली-हेश’चे नाते आणि ब्रेक-अप बाबत चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना लवकरच मिळणार आहेत.

'ब्रेक पॉइंट'च्या दिग्दर्शनाविषयी बोलताना अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी म्हणतात की, "झी5 सारख्या घराघरात पोहोचलेल्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर अशा तऱ्हेच्या सीरिजला दाखवण्यात येणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. महेश भूपति आणि लिएंडर सारख्या आयकॉन्ससोबत काम करणे अद्भुत होते आणि त्यांची अव्यक्त कहाणीला पडद्यावर उतरवणे अशी गोष्ट आहे, जी आम्ही नेहमीच जपून ठेवू इच्छितो.”

लिएंडर पेसने सांगितले, "मी झी5 च्या सहयोगातून अश्विनी अय्यर तिवारी, नितेश तिवारी यांच्यासारख्या कथाकारांसोबत 'ब्रेक पॉइंट'साठी या वॉक डाउन मेमरी लेनच्या शूटिंगचा आनंद घेतला आहे. महेश आणि मी भारताला विश्व टेनिसच्या नकाशावर आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला आमची कहाणी जगासमोर मांडण्याची संधी मिळत आहे. हे पहिल्यांदाच होत आहे. आमच्या या प्रवासाचा आनंद घ्या.”

तर महेश भूपती म्हणाला, "यात जेव्हा संवाद साधण्याची गोष्ट असते तेव्हा मी रिझर्व्हड होऊन जातो, हे काही आता रहस्य राहिलेले नाही, त्यामुळे हा प्रवास पुन्हा जिवंत करणे आणि शक्य तितक्या स्पष्ट आणि प्रामाणिक मार्गाने सादर करणे, हे एक मोठे पाऊल आहे. पण, त्याच वेळी, मला आनंद आहे की आमच्या चाहत्यांना आमचा हा प्रवास पहायला मिळणार आहे ज्यामध्ये कष्ट, चिकाटी, बंधुता आणि कधीकधी रक्त आणि अश्रू यांचे मिश्रण होते. हे निश्चीतच सर्वांसाठी एक ट्रिट असणार आहे आणि हे सर्व काही देण्यासाठी मी, अश्विनी नितेश आणि झी5चा आभारी आहे."

बातम्या आणखी आहेत...