आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकप्रिय अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स हिने अलीकडेच तिचा प्रियकर सॅम असगरीसोबत लग्न थाटले. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या या सिक्रेट वेडिंगमध्ये तिचा पुर्वाश्रमीचा पती जेसन अलेक्झांडरने खूप गोंधळ घातला आणि त्यांची लग्नाची पार्टी उधळण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता ब्रिटनीची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. ब्रिटनीचे सॅमसोबतचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तिने दोनदा लग्न केले. तिने 2004 मध्ये तिचा बालपणीचा मित्र जेसनशी लग्न केले होते. पण, ब्रिटनीचे पहिले लग्न केवळ 55 तासांतच मोडले होते.
त्यानंतर ब्रिटनीने रॅपर केविन फेडरलिनशी लग्न केले, या लग्नापासून तिला सीन प्रेस्टन आणि जेडेन जेम्स ही दोन मुले आहेत. हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
वादांशी जुने नाते
ब्रिटनीचे आयुष्य बरेच वादग्रस्त राहिले आहे. अनेक वेळा ती विचित्र कृत्यांमुळे प्रसिद्धही झाली आहे. मानसिक आरोग्य बिघडल्याने एकदा तिने तिचे सर्व केस कापले होते. गाडीच्या काचाही फोडल्या होत्या. इतकंच नाही तर आपल्या मुलांना अत्यंत निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. ब्रिटनी तिचे वडील जेमीसोबतच्या खराब संबंधांमुळे चर्चेत आली आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी दिला होता पहिला स्टेज परफॉर्मन्स
करिअरबद्दल सांगायचे तर, 1981 मध्ये मॅककॉम्ब, मिसिसिपी येथे जन्मलेल्या ब्रिटनीने वयाच्या तिस-या वर्षापासून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षी तिने पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स दिला. तिचा पहिला अल्बम 'बेबी वन मोअर टाईम' 1999 मध्ये रिलीज झाला आणि तो खूप हिट झाला. 2000 मध्ये, स्पीयर्सचा दुसरा अल्बम 'उप्स! आय डिड इट अगेन'ने तिला यशोशिखरावर नेले.
200 मिलियन डॉलरची मालकीण आहे ब्रिटनी स्पीयर्स
वयाच्या 41 व्या वर्षी ब्रिटनी सुमारे 200 मिलियन डॉलर म्हणजेच 1597 कोटी रुपयांची मालकीण आहे. ग्रॅमी व्यतिरिक्त, तिने सहा MTV व्हिडिओ संगीत पुरस्कार, सात बिलबोर्ड संगीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.