आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवोलिना भट्टाचार्जीच्या लग्नावर कुटुंबीय नाराज!:भाऊ म्हणाला - नंतर या लोकांना त्यांचे नाते का तुटले याचे आश्चर्य वाटते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न थाटले. अचानक लग्न करून तिने आपल्या चाहत्यांना तसेच कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. पण देवोलीनाचे कुटुंबीय तिच्या लग्नावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

आता देवोलीनाचा भाऊ अंदीप भट्टाचार्जीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्याने देवोलिनाच्या नावाचा उल्लेख टाळत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याची ही पोस्ट देवोलीनाकडे इशारा करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. जे लोक स्वतःचा विचार करतात त्यांना इतरांच्या मान सन्मानाची पर्वा नसते, असे तो म्हणाला आहे.

देवोलीनाचे नाव न घेता साधला निशाणा
आता देवोलीना मिसेस शहनवाज झाली आहे. देवोलीनाने कोर्ट मॅरेज केले, लोणावळ्यात एक छोटेखानी गेट टू गेदर केले. त्यांच्या लग्नात वर आणि वधूच्या बाजूने फारसे लोक दिसले नाहीत. देवोलीनाची आई त्यांच्यासोबत होती. आता तिच्या भावाची एक पोस्ट चर्चेत आहे. यात त्याने लिहिले, "जे लोक स्वत: चा विचार करतात त्यांना त्या क्षणी जे बरोबर वाटते याची काळजी असते. त्यांना तेच करायचे असते. त्यांना इतरांच्या मान-सन्मानाशी काही देणेघेणे नसते. यानंतर त्यांचे नाते का तुटले याचे त्यांना आश्चर्य वाटते." अंदीपच्या या पोस्टवरुन त्याने ही पोस्ट देवोलीनाला उद्देशून लिहिली असल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत.

अंदीपच्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर अंदीपच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले- 'मी तुमची परिस्थिती समजू शकतो, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, तिला एक ना एक दिवस नक्कीच पश्चाताप करावा लागेल.'

तर एकाने लिहिले की, 'भावा मी तुमच्याशी सहमत आहे.'

साधेपणाने केले लग्न
देवोलीनाने तिचा जिम ट्रेनर शहनवाजसोबत एका साध्या सोहळ्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिले होते, "हो मी अभिमानाने सांगू शकते की अखेर मी हे केले. हो मी आणि शोनू. मी दिवा घेऊनही शोधायला निघाले असते, तरी तुझ्यासारखा दुसरा कोणी मला मिळाला नसता. तू माझ्या वेदना आणि प्रार्थनांचे उत्तर आहेस. आय लव्ह यू शोनू. माझ्या आयुष्यातील रहस्यमयी व्यक्ती आणि तुमचा सर्वांचा जीजू #SHONU तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी असू द्या," असे कॅप्शन देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टला दिले.

दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले
देवोलीनाच्या पतीचे नाव शहनवाज शेख आहे. शहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही जिममध्ये भेटले होते. दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि आता आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.

बातम्या आणखी आहेत...