आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षांनंतर उलगडले ब्रूस लीच्या मृत्यूचे कोडे:जास्त पाणी प्यायल्याने झाले होते निधन, विष आणि शापाची थिअरही आली होती समोर

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्शल आर्टला जगभरात पोहोचवणारा अमेरिकन अभिनेते ब्रूस लीचे 1973 मध्ये वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाले होते. वेदनाशामकांच्या ओव्हरडोजमुळे मेंदूला सूज (एडेमा) आल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण शास्त्रज्ञांच्या एका टीमने आता त्याच्या मृत्यूचे खरे कारण शोधून काढले आहे. ब्रूस लीचा मृत्यू कोणत्याही औषधामुळे नव्हे तर पाण्याचे अतिरिक्त सेवनाने झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

ब्रूस लीच्या मृत्यूवरील 4 थिअरी

1. माफिया: ब्रूस लीचा मृत्यू जवळपास 50 वर्षांपासून एक रहस्य आहे. काही लोक म्हणतात की, चिनी माफियाने पैशांसाठी ब्रूस लीची हत्या केली.

2. अफेअर आणि विष : आणखी एका थिअरीनुसार, ब्रूस ली विवाहित असूनही त्याचे इतर तरुणींशी प्रेमसंबंध होते. यामुळे त्याच्या पत्नीने त्याला विष पाजले.

3. ड्रग्ज ओव्हरडोज: काही लोकांच्या सांगण्यानुसार, ब्रूस लीला ड्रग्जचे व्यसन होते. तो एलएसडीसारख्या हार्ड ड्रग्जचे सेवन करत होता, त्यामुळे त्याचा अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला.

4. शापित होता: चौथी आणि सर्वात वादग्रस्त थिअरी सांगते की, ब्रूस लीला जन्मापासूनच शापित होता, ज्यामुळे त्याचा कमी वयातच मृत्यू झाला.

हायपोनेट्रेमिया होते मृत्यूचे कारण
क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये लिहिण्यात आले की, 'उपलब्ध असलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे असे म्हटले जाऊ शकते की, ब्रूस लीच्या मृत्यूचे कारण हायपोनेट्रेमियामुळे सेरेब्रल एडेमा होते.' यामध्ये रक्तातील सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर सोडियम त्यात विरघळते. त्यामुळे मेंदुच्या सेल्सवर सूज येते. या सूजेला सेरेब्रल एडेमा म्हणतात. ब्रूस लीची किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढू शकली नाही आणि त्यातच त्याचे निधन झाले.

मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीचे 20 जुलै 1973 रोजी हाँगकाँगमध्ये निधन झाले.
मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीचे 20 जुलै 1973 रोजी हाँगकाँगमध्ये निधन झाले.

ब्रूस लीला अनेक आजारांचे धोके होते
ब्रूस ली हा लिक्विड डाएट करत होता. त्याच्या आहारात तो प्रोटीनयुक्त पेये घेत होता, ज्यामुळे तहान वाढते. शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, ब्रूस लीला हायपोनेट्रेमियाचा धोका होता. तो अति लिक्विड डाएट घेत असे. त्याच्या शारीरिक हालचालीही अशा होत्या की, त्याला जास्त तहान लागत असे.

ब्रूस लीच्या किडनी खराब झाल्या होत्या
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या वेळी ब्रूस लीच्या किडनी खराब झाल्या होत्या. किडनी कार्यरत नसल्याने अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्याच्या शरीरात पाणी भरले होते. लघवी आणि शरीरातील पाण्याची पातळी राखता न आल्याने त्याच्या मेंदूला सूज आली. यामुळे काही तासांनंतर ब्रूस लीचा मृत्यू झाला.

ब्रुस ली आजही त्याच्या मार्शल आर्ट टेक्निक, फिटनेस आणि अभिनयासाठी ओळखला जातो.
ब्रुस ली आजही त्याच्या मार्शल आर्ट टेक्निक, फिटनेस आणि अभिनयासाठी ओळखला जातो.

पत्नीने केला होता लिक्विड डाएटचा उल्लेख
ब्रूस लीची पत्नी लिंडा ली कॅडवेलने एकदा त्याच्या लिक्विड डाएटचा उल्लेख केला होता. ब्रूस ली गाजर आणि सफरचंदाचा रस नियमित सेवन करत असे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये आलेल्या 'ब्रूस ली: अ लाइफ' या पुस्तकात लेखक मॅथ्यू पॉली यांनी ब्रूस लीच्या लिक्विड डाएटचा उल्लेख केलाय.

ब्रूस लीने 'एंटर द ड्रॅगन' या हॉलिवूड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला.

बातम्या आणखी आहेत...