आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान खासगी आयुष्यात बरीच खोडकर आहे. तिच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान ती अनेकदा कलाकारांसोबत विनोद आणि चेष्टा मस्करी करताना दिसते. अलीकडेच 'तीस मार खान'च्या रिलीजच्या बऱ्याच वर्षांनी फराह आणि कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये फराह शूटिंगच्या फावल्या वेळेत कतरिनाची चेष्टा करताना दिसत आहे.
म्हणाली- बापरे या बिचारीने किती काम केले आहे
हा BTS व्हिडिओ चित्रपटातील 'वल्लाह रे वल्लाह' या गाण्याच्या शूटिंगचा आहे. फराह या गाण्याची कोरिओग्रार आहे. शूटिंगदरम्यान कतरिना या गाण्याच्या कॉश्च्युममध्ये दिसत असून स्वतःचे पाय दाबतेय.
कतरिनाच्या शेजारी बसलेली फराह तिला गमतीने धक्का देते आणि म्हणते, 'अरे या बिचारीने किती काम केले आहे. पाकीजाची मीना कुमारी, पायदेखील दुखत आहेत... जा कलमूही नाच.'
सलमान खान- अक्षय कुमारही दिसले
व्हिडिओमध्ये कतरिना कैफ, सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत डान्स करताना दिसली. तसेच ती फराह आणि चित्रपटाच्या क्रू मेंबर्ससोबत मस्तीही करताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला आहे.
2010 मध्ये रिलीज झाला होता 'तीस मार खान'
'तीस मार खान' हा चित्रपट 24 डिसेंबर 2010 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता, तर तिचे पती शिरीष कुंदर आणि त्याचा भाऊ अश्मित कुंदर यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती.
चित्रपटाची स्टार कास्ट
या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. 'तीस मार खान' या चित्रपटातील 'शीला की जवानी' हे गाणे प्रचंड हिट झाले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या दोन कलाकारांशिवाय अक्षय खन्ना, मुरली शर्मा आणि अमन वर्मा हे देखील चित्रपटात होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.