आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफानचा मुलगा बाबिल करणार डेब्यू:'काला' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, 'बुलबुल' फेम तृप्ती डिमरी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिलचा चित्रपट लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा टिझर 29 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट संगीतावर आधारित आहे. 1 मिनिट 6 सेकंदाच्या या टिझरमध्ये एक मुलगी गाणे गाताना दिसत आहे. कालाच्या टिझरमध्ये एका गाण्याचे शूटिंग दाखवण्यात आले आहे. मात्र, या टिझरमध्ये बाबिलची झलक दिसलेली नाही. टिझर बघता काला एक डार्क फिल्म असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

या चित्रपटात बाबिलशिवाय बुलबुल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी, आशिष सिंह, नीर राव आणि राज शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...