आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म रिव्ह्यू:प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात अपयशी ठरला 'बंटी और बबली 2', शर्वरी वाघ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा अभिनय आहे दमदार

ईफत कुरैशी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कालावधी - 2ः13
  • स्टार- 2.5/5

यशराज फिल्म्सचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. वरुण व्ही शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ, पंकज त्रिपाठी, असरानी, ​​प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कशी आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा ओरिजिनल आणि नवीन पिढीतील बंटी आणि बबली यांच्याभोवती फिरते. जुने बंटी बबली आता लोकांना फसवण्याचे काम सोडून राकेश आणि विन्नी या नावाने मध्यमवर्गीय कुटुंबासारखे जगत आहेत. अचानक एकेदिवशी पोलिस त्यांना अटक करतात. येथे त्यांना त्यांच्या नावावर कोणीतरी मोठा दरोडा टाकत असल्याचे समजले. हे दरोडेखोर असतात नवीन बंटी आणि बबली म्हणजेच कुणाल आणि सोनिया. नवीन गुंडांना रोखण्यासाठी पोलीस ओरिजिनल बंटी-बबलीला एक काम सोपवतात, पण ते सतत अपयशी ठरतात.

अनेक अपयशानंतर, राकेश आणि विन्नी स्वतः एक योजना बनवतात आणि सिद्धार्थ आणि सोनियाला अडकवण्यात यशस्वी होतात. ही संपूर्ण कथा रंजक बनवण्यासाठी इतर अनेक पात्रांचा समावेश करण्यात आला आहे, जे मजेदार संवादांसह प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतात. चित्रपटाची कथा अगदी प्रेडिक्टेबल आहे, मात्र तगड्या स्टारकास्टिंगमुळे कुण्या एकावर चित्रपटाला पुढे नेण्याचा भार नाही.

चित्रपटातील पात्रे कशी आहेत?

विन्नी त्रिपाठीच्या भूमिकेत राणी मुखर्जीचा अभिनय दमदार आहे, मात्र राकेश त्रिपाठीची भूमिका साकारणारा सैफ त्याच्या पात्राला न्याय देऊ शकला नाही. शर्वरी आणि सिद्धांत सोनिया आणि कुणालच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि दोघांचा अभिनयही दमदार आहे.

या चित्रपटात पंकज त्रिपाठी एका पोलिसाच्या भूमिकेत आहेत ज्यांची उत्कृष्ट डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवण्यास मदत करते.

चित्रपटाचे संगीत श्रवणीय आहे, विशेष म्हणजे यामुळे तुम्ही पहिल्या चित्रपटाला बऱ्याच ठिकाणी मिस कराल. चित्रपटातील लव्ह जू हे गाणे खूप चांगले झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...