आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दोस्ताना 2'ची कास्टिंग:ट्रेड पंडितांचा दावा - करण जोहरच्या विनंतीवरून चित्रपटात अक्षय कुमारची एंट्री, कार्तिक आर्यनला केले रिप्लेस

अमित कर्ण15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमार बहीणभावाच्या नात्यावर आधारित 'रक्षाबंधन' हा चित्रपट करत आहे
  • 'अतरंगी रे' या चित्रपटात अक्षय सारा अली खानच्या वडिलांची भूमिका वठवतोय.

करण जोहरचा आगामी चित्र 'दोस्ताना 2‘ च्या कास्टिंगबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. चित्रपटात कार्तिकऐवजी विकी कौशलला घेतले जाऊ शकते. मात्र, करण या भूमिकेसाठी अक्षय कुमारला घेण्याचे प्लॅनिंग करत असल्याचे बोलले जात आहे. अक्षय आणि करण खूप जुने मित्र आहेत. दोघांनी नुकतेच 'गुड न्यूज’मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट हिट ठरला हाेता. आता जेव्हा ‘दोस्ताना 2’ बाबत अडचणी आल्यानंतर करणच्या विनंतीवरून अक्षयने तयारी दाखवली.

जान्हवीच्या भावाच्या रूपात दिसणार
जान्हवी आणि अक्षय या चित्रपटात रोमँटिक पेयर नव्हे. तर भाऊ-बहिणीच्या रूपात असतील, अशीही चर्चा आहे. असे असले तरी याबाबत अद्याप कोणीही अधिकृत घोषणा केली नाही. अक्षय भाऊ-बहिणीच्या नात्यावर अाधारित चित्रपट "रक्षाबंधन' करत आहे, हे इथे उल्लेखनीय आहे.

बातम्या आणखी आहेत...