आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. ही जोडी या महिन्यात अलिबागमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. या पंजाबी लग्नासाठी कुटुंबीयांनी पंचतारांकित हॉटेल बुक केले असून केवळ 200 खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात वरुण आणि नताशाचे लग्न होणार होते, परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.
2019 पासून सुरु आहे लग्नाची तयारी
वरुण आणि नताशा बालमित्र आहेत. 2018 मध्ये वरुणने नताशासोबतच्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता पिंकविलाच्या वृत्तानुसार, धवन कुटुंबीयांनी अलीकडेच अलीबागमध्ये पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. तर एका मुलाखतीत वरुणने सांगितले होते की, यावर्षी शक्य तितक्या लवकर तो लग्न करणार आहे.
नताशाने मागील वर्षी ठेवले होते करवा चौथचे व्रत
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नताशा दलालने पहिल्यांदाच करवा चौथचा उपवास ठेवून सर्वांना चकित केले होते. नताशा तिच्या होणा-या सासूबाई करुणा धवन यांच्यासोबत करवा चौथच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. सुनीता कपूर यांच्या घरी झालेल्या या सेलिब्रेशनमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
वरुणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा 'कुली नं 1' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत दिसला होता. तर 'जुग जुग जियो', परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांचा बायोपिक 'इक्कीस' हे वरुणचे आगामी चित्रपट आहेत. 'इक्कीस' हा चित्रपट बदलापूर फेम श्रीराम राघवन दिग्दर्शित करणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.