आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तुत्वाला सलाम:कॅलिफोर्नियाकडून सुशांत सिंह राजपूतचा मरणोत्तर सन्मान, मोठ्या बहिणीने स्वीकारला पुरस्कार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने सुशांत सिंह राजपूतचा खास सन्मान केला आहे.

आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर जगभरातून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी प्रार्थना केली जात आहे.दरम्यान सुशांतच्या मोठी बहीण श्वेता सिंह किर्तीने बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने सुशांत सिंह राजपूतचा खास सन्मान केला आहे. श्वेता सिंह किर्तीने हा पुरस्कार त्याच्या वतीने स्वीकारला आहे. श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.सामाजिक कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सुशांतचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.

श्वेता सिंह किर्तीने ट्विटरच्या माध्यमातून सुशांतच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. श्वेताने ट्विट केले, 'आज स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांत सिंह राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफॉर्निया आमच्याबरोबर आहे, तुम्ही आमच्या बरोबर आहात का? कॅलिफोर्निया तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. #GlobalPrayersForSSR #Warriors4SSR #CBIForSSR #Godiswithus', अशा आशयाचे ट्विट श्वेताने केले आहे.

  • सुशांतसाठी झाली ग्लोबल प्रेयर

आज सुशांतच्या बहीण श्वेताने एका ग्लोबल प्रेयरचे आयोजन केले होते. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकितालोखंडे हिने देखील लोकांना #GlobalPrayersForSSR मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत. यानंतर श्वेताने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यात राजपूत कुटुंबीय सुशांतच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करताना दिसत आहेत.

सुशांतच्या मृत्यूला 2 महिने उलटून गेले आहेत. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा होऊ शकलेला नाही. सुशांतच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांतच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधून कंगना रनोट, त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, क्रिती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चौप्रा, सिद्धार्थ चतुर्वेदी, मौनी रॉय, जरीन खान यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...