आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनने मागील वर्षी ख्रिसमसच्या दिवशी सहावे लग्न थाटले. होय, सहावे लग्न... 53 वर्षीय पामेलाने ख्रिसमस 2020 रोजी तिचा बॉडीगार्ड डेन हायरस्टसोबत लग्न केले आहे. पण तिचा हा पाचवा पती आहे. पामेलाने एकाच व्यक्तीसोबत दोनदा लग्न करुन घटस्फोट घेतला होता. अशा प्रकारे आता पामेलाचे सहाव्यांदा लग्न झाले आहे. दोघांचे व्हँकुवर आयलँडवर लग्न झाले आहे.
25 वर्षांपासून सुरु आहे पामेलाचा लग्नाचा सिलसिला
पामेलाचे पहिले लग्न 1995 साली टॉमी लीसोबत झाले होते. टॉमी आणि पामेला यांना ब्रँडन थॉमस आणि डायलेन जॉगर ही दोन मुले आहेत. मात्र तिचे पहिले लग्न केवळ 3 वर्ष टिकले आणि 1998 मध्ये दोघांचे घटस्फोट झाला. 2006 मध्ये पामेलाने गायक किड रॉकसोबत दुसरे लग्न केले होते, परंतु दोघे एका वर्षाच्या आतच विभक्त झाले. पामेलाने 2007 मध्ये रिक सालोमनसोबत तिसरे लग्न थाटले पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. विशेष म्हणजे पामेलाने 2005 मध्ये पुन्हा एकदा रिकसोबत लग्न केले होते. पण ते पुन्हा एकदा विभक्त झाले. त्यानंतर 2020 मध्ये तिने जॉन पीटर्ससोबत पाचव्यांदा लग्न केले. पण केवळ 12 दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला.
याशिवाय पामेला आणि विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांच्यासोबतचेही नाते चर्चेत होते. ती बर्याचदा लंडनमधील इक्वाडोरियन दूतावासात गेली होती, जिथे असांजे 2012 पासून राहत आहेत. 2010 च्या स्वीडन दौर्यादरम्यान असांजवर बलात्काराचा आरोप लागला होता, तेव्हापासून तो दूतावासात आहे.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाला म्हटले गुडबाय
या आठवड्यात पामेलाने सोशल मीडिया सोडत असल्याचे उघड केले. ती म्हणाली होती - ती आता ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करणार नाही. पामेलाने एका पोस्टमध्ये लिहिले, माझ्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील ही शेवटची पोस्ट असेल. तिला सोशल मीडियामध्ये कधीच रस नव्हता, असेही पामेलाने स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.