आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमोशनल पोस्ट:चिरंजीवी सरजाची गर्भवती पत्नी मेघनाने लिहिले , 'आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची अजून वाट पाहू शकत नाही'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिरंजीवी यांचे 7 जून 2020 रोजी निधन झाले.

दाक्षिणात्य अभिनेत्री मेघना राजने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेघनाने तिचे दिवंगत पती आणि अभिनेता चिरंजीवी सरजाचे स्मरण केले आहे. त्यांच्या निधनाच्या दहा दिवसांनी मेघनाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

मेघनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'चिरू (चिरंजीवी यांचे टोपणनाव) मी वारंवार प्रयत्न केला पण तुझ्यासाठी माझ्या काय भावना आहेत, या मी शब्दांत व्यक्त करु शकत नाहीये. या जगातील सर्व शब्द तू माझ्यासाठी काय होता हे स्पष्ट करू शकत नाही. माझा मित्र, माझा प्रियकर, माझा जोडीदार, माझी पती - यासर्वांपेक्षा तू श्रेष्ठ आहेस. तू माझ्या आत्म्याचा भाग आहेस... चिरू', अशी भावनिक पोस्ट मेघनाने लिहिली. 

मेघनाने पुढे लिहिले, 'प्रत्येक वेळी मी जेव्हा दरवाजाकडे पाहतो तेव्हा माझ्या आत्म्याला खूप वेदना होतात. तू त्या दारातून ' मी घरी आलो आहे', हे बोलताना दिसत नाहीस. जेव्हा मी तुला स्पर्श करु शकत नाही तेव्हा माझ्या अंत:करणाला काय वाटतं हे मी सांगू शकत नाही. हे मृत्यूसारखे वेदनादायक क्षण आहेत. पण नंतर मला माझ्या अवतीभोवती जादूचा भास होतो. जेव्हा जेव्हा मला एकटेपणा जाणवतो, तेव्हा तू माझ्यासारखे देवदूतासारखे उभा असतो', या शब्दांत मेघनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

View this post on Instagram

MY CHIRU FOREVER ❤️

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj) on Jun 17, 2020 at 9:54pm PDT

मेघना गर्भवती आहे: मेघनाने या नोटमध्ये तिच्या गरोदरपणाचा संदर्भ देत लिहिले की, 'तुझे माझ्यावर एवढे प्रेम आहे, की तू मला कधीही एकटे सोडू शकत नाही. आमचे मूल माझ्यासाठी आपली सर्वात मोठी भेट असेल. आपल्या प्रेमाची निशाणी. यासाठी मी कायमच तुझी आभारी आहे. मी आपच्या मुलाच्या रुपात तुझ्या परत येण्याची आणखी वाट पाहू शकत नाही. मी तुला पुन्हा हसताना पाहण्यासाठी अजून प्रतीक्षा करू शकत नाही. मी तुझी वाट पाहत आहे आणि तूसुद्धा त्या जगात माझी वाट पाहशील', असे मेघना म्हणाली. 

2018 मध्ये झाले होते लग्न : चिरंजीवी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1980 रोजी झाला होता. त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न केले होते. चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. 39 वर्षीय चिरंजीवीचे  कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले होते.  

बातम्या आणखी आहेत...