आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेरशाह'चा बोलबाला:कॅप्टन विक्रम बत्रांच्या कुटुंबियांनी डिंपल चीमाच्या भूमिकेतील कियारा आडवाणीचे केले कौतुक, अभिनेत्री म्हणाली - 'कौतुक ऐकून मला अश्रू अनावर झाले'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विक्रम बत्रा कॉलेज जीवनात डिंपल यांना भेटले होते.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा ‘शेरशाह’ या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका वठवली आहे. तर कियाराने कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे. डिंपल चीमा यांची चित्रपट बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया होती हे कियाराने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

कियारा म्हणाली, 'चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी डिंपल यांना मेसेज केला होता. त्यांच्यासाठी हा भावनिक चित्रपट आहे. मला त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करायचा आहे. चित्रपटानंतर जेव्हा मी कॅप्टन बत्रा यांच्या कुटुंबाला भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की मी अगदी डिंपल यांच्यासारखीच आहे. त्यावेळी माझे अश्रू अनावर झाले. मला याची जाणीव आहे की चित्रपटात असलेल्या गाण्यांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. त्यांना अभिमान आहे की त्यांच्या कहाणीने प्रत्येकाची मने जिंकली आहेत.'

चित्रीकरणापूर्वी डिंपल यांना भेटली होती कियारा

चित्रीकरणापूर्वी कियाराने डिंपल यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान डिंपल यांनी विक्रम यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी कियारासोबत शेअर केल्या होत्या. दोघींची भेट चंदीगड येथे झाली होती.

डिंपल यांनी लग्न केले नाही
विक्रम बत्रा कॉलेज जीवनात डिंपल यांना भेटले होते. दोघे चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करणार होते. मात्र त्याचदरम्यान ते कारगिल युद्धावर गेले आणि या युद्धात शहीद झाले. अशाप्रकारे डिंपल आणि त्यांचे प्रेम अधुरे राहिले. कॅप्टन विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर डिंपल यांनी कुणाशीही लग्न केले नाही.

‘शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला ओमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धा दरम्यान देशाची सेवा करताना शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...