आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मागील रविवारी बंगळुरुमध्ये एका ऑडी चालकाने ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. पोलिसांनी आता या कारची ओळख पटवली असून ही कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे रिपोर्ट्समध्ये पोलिस सुत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे. मात्र कुंद्रा यांनी 2 महिन्यांपूर्वीच ही कार विकली होती.
पोलिसांनी सांगितले की, "संबंधित कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे मुंबईच्या RTO अधिकाऱ्यांकडून समजले. राज कुंद्रा यांनी दोन महिन्यांपूर्वी ती कार बंगळुरूच्या एका कार डिलरला विकल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. वाहनाच्या कागदपत्रांमध्ये अजूनही राज कुंद्रा यांचे नाव होते. ते बदलले नव्हते."
कार डीलरने कबूल केली चूक
मोहम्मद साहब अशी कार डिलरची ओळख पटली आहे. अपघातावेली मोहम्मद साहब हेच गाडी चालवत होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर ते म्हणाले की, "मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे घटनास्थळी थांबलो नाही. मी अपघातातील वाहनांची नुकसान भरपाई देण्यात तयार आहे."
रविवारी दुपारी 2:45 वाजता घडली घटना
सदरील घटना रविवारी दुपारी 2.45 वाजता घडली. MH-02-BP-0010 क्रमांकाची ऑडी R8 ने सेंट मार्क्स मार्गावर एका हॉटेलजवळ एक ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. कुणाला काही समजायच्या आत कार तेथून गायब झाली होती. ऑटोड्राइवर आणि दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली मात्र वाहनांचे बरेच नुकसान झाले होते. या प्रकरणी कब्बन पार्क वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.