आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हॅरी पॉटर'च्या चाहत्यांना आणखी एक धक्का:अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी झोपेतच मालवली प्राणज्योत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हॅरी पॉटर' आणि 'कॅरी ऑन' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची झोपेतच प्राणज्योत मालवली. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

एजंट जोनाथन लॉयड यांनी लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेस्ली यांचे 7 नोव्हेंबर रोजी झोपेत निधन झाले. ते यापूर्वी दोनदा स्ट्रोकपासून थोडक्यात बचावले होते. पण यावेळी झोपेतच त्यांचे निधन झाले.

80 वर्षांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टीत होते कार्यरत
लेस्ली फिलिप्स यांनी हॅरी पॉटरमधील सॉर्टिंग हॅटला आवाज दिला होता. 80 वर्षांहून अधिक काळ ते या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते. त्यांनी 200 हून अधिक चित्रपट, टीव्ही शो आणि रेडिओ मालिकांमध्ये काम केले.

1924 मध्ये झाला होता जन्म
फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 मध्ये झाला होता. ब्रिटन आणि अमेरिकेत ते त्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध होते. 'कॅरी ऑन टीचर', 'कॅरी ऑन कोलंबस' आणि 'कॅरी ऑन नर्स' या चित्रपटांमुळे त्यांना सर्वाधिक प्रसिद्ध मिळाली. याशिवाय ‘डॉक्टर इन द हाऊस’, ‘टॉम्ब रेडर’ आणि ‘मिडसमर मर्डर्स’ या चित्रपटात त्यांनी काम केले. फिलिप्स यांच्या पश्च्यात त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी झारा आहेत.

14 ऑक्टोबर रोजी झाले होते 'हॅग्रिड'चे निधन

फिलिप्स यांच्यापूर्वी हॅरी पॉटर या चित्रपटाच्या सिरीजमध्ये हॅग्रिडची भूमिका वठवणारे अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाले होते. 14 ऑक्टोबर रोजी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रॉबी काही काळापासून आजारी होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. रॉबी कोल्ट्रेन यांना खरी ओळख 'हॅरी पॉटर'मधून मिळाली. 'हॅरी पॉटर' सिरीजच्या चित्रपटांशिवाय ते 'क्रॅकर' या डिटेक्टिव ड्रामातही दिसले होते. त्यांची विनोदी शैली चाहत्यांना खूप आवडली. चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, रॉबी एक लेखक देखील होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...