आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट निर्मात्यावर शारिरिक शोषणाचा आरोप:उल्लू अ‍ॅडल्ट अ‍ॅपचा सीईओ विभू अग्रवालवर 28 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप, मुंबईत गुन्हा दाखल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभू अग्रवालचे उल्लू अ‍ॅप अश्लील कंटेटसाठी ओळखले जाते.

मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता विभू अग्रवाल विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून विभूविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभू व्यतिरिक्त, त्याच्या कंपनीत कंट्री हेड असलेल्या अंजली रैनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध 4 ऑगस्ट रोजी आंबोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. 28 वर्षीय पीडितेने आरोप केला आहे की, विभूची कंपनी उल्लू डिजिटलच्या ऑफिसमधील स्टोअर रूममध्ये तिचा विनयभंग करण्यात आला.

विभू अग्रवाल उल्लू डिजीटल नावाने कंपनी चालवत होता. उल्लू अ‍ॅप अश्लील कंटेटसाठी ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीदरम्यान, विभू अग्रवालने उल्लू प्लॅटफॉर्मचा कंटेंट कौटुंबिक कंटेंटमध्ये बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 2013 मध्ये विभू अग्रवालने 'बात बन गई' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याने 2018 मध्ये ULLU अ‍ॅप लाँच केले होते. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, या अ‍ॅपवर भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती भाषेत अ‍ॅडल्ट कंटेंट दाखवला जातो.

अ‍ॅपवरील कंटेंट बदलण्याविषयी मुलाखतीत विभू म्हणाला होता की, 'आम्ही उल्लूबद्दल लोकांच्या मनात असलेली भावना बदलण्याचा विचार करतोय. त्यामुळे या अ‍ॅपवर असलेला 60 टक्के कंटेंट बदलून कुटुंबीय पाहू शकतील असा कंटेंट आणणार आहोत. कारण जेव्हा उल्लू हे नाव घेतले जाते तेव्हा लोकांच्या मनात केवळ अश्लील फिल्म हाच विचार येतो. आमचे देखील कुटुंब आहे त्यामुळे आम्ही हे बदलू इच्छितो.'

उल्लूचे स्पष्टीकरण - तक्रार दाखल करणारी स्वतः आरोपी आहे
या संपूर्ण वादावर, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उल्लूने 10 जून रोजी लखनौ पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अज्ञात लोकांविरोधात फसवणूक आणि लाखो रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात, आयपी अ‍ॅड्रेसच्या चौकशीत उल्लूची माजी कायदेशीर प्रमुख, एक महिला आणि तिचा साथीदार यामागे असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील
आरोपींनी आता विभू अग्रवाल आणि अंजली रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत काउंटर अटॅक करताना महिलांसाठी बनवलेल्या कायद्याचा गैरवापर केला आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या पॉर्न कंटेंटची चर्चा
पॉर्न फिल्म्स बनवल्याप्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूड अॅडल्ट कंटेंटसंदर्भात बरीच चर्चा आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तो सध्या मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. कुंद्राच्या बेकायदेशीर मनी ट्रेलचाही पोलीस तपास करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीवरून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपशीलही शेअर केला आहे. कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन विकल्याचा आरोप आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राचीही चौकशी करण्यात आली
सॉफ्ट पॉर्न प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कार्यालयातही चौकशी केली जात आहे. शर्लिनचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राईम मीडियाशी करार होता. हा करार भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अॅप्ससाठी अश्लील कंटेंट पुरवण्यासंदर्भातील होता.

बातम्या आणखी आहेत...