आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळींसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल, वकील म्हणाले - आरोप सिद्ध झाल्यास 10 वर्षांची होऊ शकते शिक्षा

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारमधील मुझफरपूर येथे 8 जणांविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश राज, रवीना टंडन, दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यासह अनेक जण उघडपणे घराणेशाहीवर आपले मत व्यक्त करत आहेत. याशिवाय बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या गटबाजीवरुनही चर्चांना उधाण आले आहेत.

आता करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळी यांच्यासह आठ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ओझा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लावलेले आरोप सिद्ध झाल्यास, या सर्वांना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

या तक्रारीमध्ये सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले, असा आरोप सुधीर ओझा  यांनी केला आहे. सुधीर यांनी आठ कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे. त्यामध्ये सलमान खान,  करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात कलम 306, 109, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. 

14 जून रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले होते.  

बातम्या आणखी आहेत...