आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याच्या अडचणीत वाढ:साहिल खानवर मनोज पाटीलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अभिनेता म्हणाला - आत्महत्या हा बनाव आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता या प्रकरणावर साहिल खानने भाष्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता साहिल खानवर आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू आणि ‘मिस्टर इंडिया’ किताबाचा मानकरी असलेल्या मनोज पाटीलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साहिलसह अन्य तीन जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मनोज पाटीलने बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मनोजने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली होती, ज्यात त्याने आपल्या आत्महत्येसाठी अभिनेता साहिल खान जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणावर साहिल खानने भाष्य केले आहे. त्याने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

कायदेशीर कारवाई करणार
या वादात नाव समोर आल्यानंतर साहिलने पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्याने सांगितले की संपूर्ण प्रकरण मनोज आणि राज फौजदार नावाच्या व्यक्तीमधीलआहे. मी राज फौजदार नावाच्या एका व्यक्तीला एका सोशल नेटवर्किंग साईटवर भेटलो. तो दिल्लीचा आहे आणि त्याने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात त्याने सांगितले होते की, मनोज पाटीलने त्याच्याकडून 2 लाख रुपये घेतले आणि त्याला एक्सपायर्ड झालेले स्टिरॉइड्स विकले त्यानंतर त्याला हृदय आणि त्वचेशी संबंधित त्रास झाला.

फौजदार या व्यक्तीकडे वित्त व्यवहाराची सर्व बिले आणि पावत्या आहेत. त्याला सोशल मीडियामध्ये त्याचा माझआ पाठिंबा हवा होता. म्हणून मी त्याचा व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आणि लोकांना फौजदारांना पाठिंबा देण्यास सांगितले. मी असेही म्हटले की, स्टेरॉईड रॅकेट थांबले पाहिजे.

साहिल पुढे म्हणाला की, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मनोजने फौजदारची फसवणूक केली. त्याला न्याय मिळावा, यासाठी मी प्रयत्न केल्याचे साहिल खानने म्हटले आहे. मनोजची आत्महत्या हा देखील बनाव असल्याचे साहिलने म्हटले आहे.

मनोजने चिट्टीत काय लिहिले होते?
मनोजनं बुधवारी रात्री विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. मनोजने आत्महत्या करण्यापूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या नावे एक चिठ्ठी लिहिली लिहिली आहे. या चिठ्ठीत साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे मनोजने म्हटले. साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणीही त्याने केली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून साहिल खान मला आणि माझ्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टार्गेट करत असून त्याचा मला मानसिक त्रास होत आहे. मी आणि माझ्या पत्नीमधील वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीनं मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचं कारस्थान साहिल खान रचत आहे. त्यामुळे माझा अमेरिकेला जाण्याचा व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे,’ असे मनोजने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...